आजचे राशीभविष्य – (बुधवार, १६ सप्टेंबर २०२०)
मेष – स्वतःला शांत ठेवा
वृषभ – वेट अँड वॉच
मिथुन – दिवस नरम-गरम राहील
कर्क – अनपेक्षित दगदग
सिंह – विचारपूर्वक मतप्रदर्शन करा
कन्या – हेलपाटा होऊ शकतो
तूळ – दुपारनंतर थोडी धावपळ
वृश्चिक – विसंबून राहू नये
धनु – कामाची गुंतागुंत टाळा
मकर – वरिष्ठांची मर्जी सांभाळा
कुंभ – झाकली मूठ असुद्या
मीन- प्लॅनिंग ची अंमलबजावणी होईल…..
शंकासमाधान
प्रश्न – मोकाशी- माझ्या हस्ते रेषांवरून मी कोणते रत्न वापरावे?
उत्तर- आपल्या हस्तरेषा बघता लोअर मून माउंट वर हॅज असल्याने आपण केसी प्रकारातला दोन कॅरेट मोती चांदीमध्ये उजव्या हातातील करंगळीत वापरावा..
प्रश्न – चौधरी- पाचू रत्ना ऐवजी पर्यायी रत्न सुचवा ?
उत्तर- आपण प्यारी डॉट लश ग्रीन तीन कॅरेट पंचधातु मध्ये उजव्या हातातील अनामिकेत वापरा.
प्रश्न – त्रिवेदी- नक्षत्र वृक्ष आराधना म्हणजे काय?
उत्तर- नक्षत्र शास्त्रामध्ये प्रत्येक नक्षत्रा साठी एका वृक्षाचे संगोपन संवर्धन व आराधना सुचवली आहे. आपले जन्म नक्षत्र अनुराधा असल्याने आपण नागकेशर या वृक्षाचे संगोपन व आराधना करावी.
प्रश्न- मंजिरी- आमच्या फार्म हाऊसचे मुख्य गेट पूर्व दिशेस येत असून वास्तुशास्त्राप्रमाणे ते नक्की कुठे घ्यावे?
उत्तर- प्रथम पूर्व दिशेच्या फेन्सिंगचे समान नऊ भागांवर जमिनीवर खुणा कराव्यात त्यानंतर ब्रह्म तत्वात पूर्व दिशेकडे तोंड करून उभे रहावे. डाव्या बाजूने तिसरा भाग जयंत चौथा महेंद्र पाचवा रवी सहावा सत्य या चार भागांपैकी कोठेही मुख्य गेट घ्यावे चारही भाग एकत्र केले तरी चालतील….
वास्तु टीप –
चपला घालून उंबरठा ओलांडू नये उंबरठ्यावर पाय देऊन उभे राहू नये….
रत्न टीप-
मंगळ साठी कोरल रत्न सुचवले असल्यास स्त्रियांनी बेस फ्लॅट सिलेंडर शेप इटालियन प्रकारातील कोरल तर पुरुषांनी त्रिकोणी इटालियन कोरल वापरावा…. स्फटिक माळ
टीप- स्फटिक माळखरेदी करताना स्फटिक माळ हातात घेऊन ती आता गोळा करावी तिचा स्पर्श कानाला करावा स्फटिकाच्या नैसर्गिक आल्हाददायक गारवा जाणवल्यास खरेदी करावे…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असल्याने शुभ कार्य टाळावीत.
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.