आजचे राशीभविष्य – गुरुवार – १२ नोव्हेंबर २०२०
मेष- छोट्या लाभासाठी मोठे निर्णय नको
वृषभ- आर्थिक अंदाज बरोबर येतील
मिथुन- स्वतःवर लक्ष केंद्रित करा
कर्क- गुंतवणुकीचे नवे प्रस्ताव
सिंह- एकतर्फी निर्णय नको
कन्या- भावनांचा अतिरेक टाळा
तूळ- लॉजिकल फोरकास्टिंग गरजेचे
वृश्चिक- योग्य व्यक्तींकडे व्यक्त व्हा
धनु- तुटेपर्यंत ताणू नका
मकर- कौटुंबिक निर्णयात आपला शब्द महत्त्वाचा
कुंभ- हर हाल मे जीतना ही है
मीन- अंतरात्म्याचा आवाज ऐका
…….
दीपावली उत्सव टिप्स-
आजपासून दीपावलीचे शुभ पर्व सुरु होत आहे या निमित्त खास टिप्स.. सायंकाळी दार पणत्या लावताना त्या उंबरठ्याबाहेर ठेवाव्यात. पणतीची ज्योत बाहेरच्या बाजूला करावी. वास्तूचे ब्रम्ह तत्व तुळशी वृंदावन स्वच्छतागृहे देवघर सर्व खिडक्या येते पण ठेवाव्यात. दीप प्रज्वलन साठी तिळाच्या तेलाचा वापर करा. मुख्य प्रवेशद्वारात आत येणारी गोपद्म काढावीत. त्यावर हळद-कुंकू वहावे. फक्त पांढऱ्या रंगाची रांगोळी काढू नये. हा दिव्यांचा सण असल्याने सर्व वास्तू व परिसर सायंकाळनंतर प्रकाश मान ठेवावा. दिवाळीचे सर्व दिवस सकाळी पूजेनंतर कुलदेवतेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. आकाश कंदील सायंकाळपासून पहाटे अमृत मुहूर्ता पर्यंत ठेवावा.. वास्तूमध्ये चंदन मोगरा गुलाब निशिगंध यांचा मंद दरवळ असावा.. सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.