आजचे राशीभविष्य – गुरुवार – २२ ऑक्टोबर २०२०
मेष- लहान गोष्टी सोडून द्या
वृषभ- शुभवार्ता
मिथुन- कुछ पाना कुछ खोना
कर्क- खर्च सांभाळा
सिंह- अवास्तव अपेक्षा नको
कन्या- अंदाज अचूक येथील
तूळ- अतिविचार नको
वृश्चिक- गुंतवणुकीचा फायदा
धनु- अनपेक्षित खर्च
मकर- वाद टाळा
कुंभ- परिचयाचा फायदा
मीन- अनपेक्षित शुभवार्ता
…..
शंकासमाधान
प्रश्न चैत्राली – ब्युटीपार्लरची रचना कशी असावी?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे तसेच ऊर्जा जडत्व तत्त्वाप्रमाणे ही रचना पुढील प्रमाणे करावी. उत्तर किंवा पूर्व दिशेकडे त्याचप्रमाणे ब्रह्म तत्त्वापासून उत्तर दिशेकडील मध्य किंवा जास्तीत जास्त वायव्येकडे तीस अंश त्याचप्रमाणे पूर्व दिशेकडे मध्य किंवा आग्नेयेकडे जास्तीत जास्त 30 अंश या भागामध्ये मुख्य प्रवेश आणि आरशांची रचना करावी. पार्लर साठी लागणाऱ्या सर्व वस्तू शोकेस डिस्प्ले, वेटिंग सोफा हे सर्व दक्षिण-मध्य ते पश्चिम वायव्य एवढा भागापर्यंत करता येईल. संपूर्ण पार्लरला मॉर्निंग ग्लोरी ही रंग संगती करावी. दक्षिण मध्य ते वायव्य पर्यंत मॉर्निंग ग्लोरी शेडला 25% क्रॉस जाईल एवढ्याच DARK शेडचे PANELING अथवा कर्टन करावे. उत्तर पूर्व ईशान्य कडे कर्टन्स लावायचे असल्यास सॉफ्ट आणि हलक्या रंगाचे घ्यावे. पार्लरचा संबंध सौंदर्यप्रसाधने यांच्याशी येत असल्याने वास्तूचा चंद्र प्रवाह हा अतिशय खुला हवा. ROOF ला कुठेही क्रॉस कलरिंग क्रॉस कलर डेकोरेशन टाळावे. पार्लरमध्ये सूर्य प्रवाह जास्त असल्यास व मुख्य प्रवेश दक्षिण-पश्चिम नैऋत्य कडूनच शक्य असल्यास कोठेही कोणत्याही प्रकारचे क्रॉस कलरिंग करू नये. पार्लरसाठी लागणारे इतर मशिनरी या दक्षिण आग्नेय ते पश्चिम-मध्य या भागांमध्ये प्लेस कराव्या. चंद्र प्रवाह भरपूर असला तर साध्या व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तर सूर्य प्रवाह जास्त असता थंड पाणी पिण्यासाठी ठेवावे. ब्युटी पार्लर च्या SERVICES कार्डची कलर स्कीम 50% कॉन्ट्रास्ट घ्यावी. संपूर्ण अपोझिट कलरचे कार्ड नसावे. MAIN MIRROR भोवतीचे GLOW लाइट्स ची रचना मिरर भोवती सी टाईप मध्ये 2 STEP enlighten पद्धतीचे करावी. याचा अर्थ मिरर भोवतीचे लाइट्स 30% ON तर 70% OFF असे राहतील. गरज पडली तर याउलट नाहीतर एकाच वेळी हंड्रेड परसेंट…. मुख्य MIRROR ची लांबी रुंदी ODD साईज मध्ये घ्यावी. पार्लरमध्ये संवाद साधताना MIDDLE OCTAVE मध्ये करावा. कोणत्याही प्रकारचे बीट सॉंग म्युझिक न लावता WAVES MUSIC असावे… मुख्य आर्थिक व्यवहार तसेच डिस्कशन टेबल दक्षिण-पश्चिम अथवा नैऋत्य कॉर्नर ला घ्यावा… सर्व प्रकारची बैठकीची रचना ही उत्तर-पूर्व FACING असावी. फेशियलसाठी CLIENT ते डोके दक्षिणेला व पाय उत्तर येतील असे पाहावे अथवा डोके पूर्व दिशेला पाय पश्चिमेला येतील असे पहावे. बाहेर पार्लरचे नाव हे संचालक व्यक्तीच्या नावाच्या राशी नक्षत्रांच्या मित्र असलेल्या राशी नक्षत्र गटातील शक्यतो असावे. अल्फाबेट भाग्यांक पाहून ठेवल्यास अति उत्तम. येथील कस्टमर SHOERACK कव्हर असावी. फ्रेश रूम मध्ये देखील कोणत्याही प्रकारचा डार्क रंगाचा वापर नसावा येथे गरजेपेक्षा थोडी जास्त LED लाईट वापरावी. तसेच संपूर्ण पार्लरमध्ये एकाच WATTAGE च्या एलईडी लाईट वापराव्या. वास्तूमध्ये येणारा नैसर्गिक उजेड त्यासोबत लाईट सिस्टीम व शुभ उर्जा सांभाळणाऱ्या रंग संगती याचे योग्य ते कोऑर्डिनेशन साधल्यास वास्तूमध्ये गुरुतत्त्व तयार होते. एकंदरीतच वास्तूचा AURA सकारात्मक होतो. त्यामुळे व्यवसायवृद्धी होत असते
आजचा रंग
आजचा महा वस्त्राचा रंग पिवळा आहे.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे..
—
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.