आजचे राशीभविष्य – गुरुवार – १५ ऑक्टोबर २०२०
मेष- मानसिक ताण
वृषभ- तब्येतीच्या किरकोळ तक्रारी
मिथुन- धनलाभ
कर्क- खर्च जपा
सिंह- डोळ्यांचा किरकोळ त्रास
कन्या- ज्येष्ठांच्या गाठीभेटी
तूळ- वाहन जपून चालवा
वृश्चिक- वेळेचा अपव्यय टाळा
धनु- अडचणींवर मात
मकर- अतिउत्साह नको
कुंभ- अडकलेली कामे मार्गी लागतील
मीन- मौनं सर्वार्थ साधते
……
शंकासमाधान
प्रश्न श्यामल – स्वतंत्र वास्तूमध्ये चार मुख्य दिशांचे कोणते दरवाजे वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य असतात?
उत्तर – वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मुख्य दिशांच्या बाजूला ब्रह्म तत्त्वापासून त्याच्या दिशेकडे तोंड केल्यानंतर कोणत्या खंडातले दरवाजे घ्यावे याचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. सर्वप्रथम दिशा पूर्व दिशेच्या लांबीचे समान आठ भाग करावे. त्यानंतर ब्रह्म तत्वात उभे राहून पूर्व दिशेकडे तोंड करावे. डाव्या बाजूने तिसरा खंड जयंत, चौथा खंड इंद्र, पाचवा खंड सूर्य या तीनपैकी कोणत्या खंडात पूर्व दिशेचा मुख्य दरवाजा करावा. शक्यतो इंद्र किंवा सूर्य दरवाजा घ्यावा म्हणजे बाहेरचे फेन्सिंगचे गेट जयंत खंडात घेता येते. तेव्हा बाहेरचा गेट ते मुख्य प्रवेशद्वार हा प्रदक्षिणा मार्ग होतो. त्याचप्रमाणे पश्चिम दिशेकडील लांबीचे समान आठ भाग करावे. ब्रह्म तत्वात उभे राहून पश्चिम दिशेकडे तोंड करावे व डावीकडून तिसरा खंड सुग्रीव चौथा पुष्पदंत पाचवा रवी यापैकी कोणत्याही खंडात मुख्य प्रवेशद्वार घ्यावे. शक्यतो याही दिशेला पुष्पदंत अथवा रवी या खंडात मुख्यद्वार घ्यावे. म्हणजे बाहेरील गेट सुग्रीव खंडात घेता येऊन मुख्य प्रवेश हा प्रदक्षिणामार्ग होतो. त्याचप्रमाणे उत्तर दिशेकडे याच पद्धतीने चौथा खंड बल्लाट व पाचवा सोम याठिकाणी मुख्य प्रवेश घ्यावा. सोम खंडात घेतल्यास बल्लाट मार्गे प्रदक्षिणा मार्ग बनतो. व दक्षिण दिशेला चौथा खंड बृहत क्षत पाचवा यम, सहावा गंधर्व या खंडात प्रवेशद्वार घ्यावे. त्यापैकी यम आणि गंधर्व येथे घेतल्यास बृहत क्षत मार्गे प्रदक्षिणामार्ग बनतो. या सर्व खंडांच्या खुणा व प्रदक्षिणामार्ग हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आखून घ्यावे.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असल्याने शुभ कार्य टाळावीत.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.