आजचे राशीभविष्य – गुरुवार – ७ ऑक्टोबर
मेष- पूर्वानुभव कामाचा
वृषभ- आनंदी दिवस
मिथुन- सल्लामसलत
कर्क- ताणतणावाचे व्यवस्थापन करा
सिंह- फार दूरचा विचार नको
कन्या- भावनिक गुंतागुंत टाळा
तूळ- स्वतःपुरते पहा
वृश्चिक- दानधर्म
धनु- श्रोता बना
मकर- नवी खरेदी
कुंभ- निसर्गात दिवस जाईल
मीन- शिकणे शिकवणे यात यश
……..
शंकासमाधान
प्रश्न ज्योतिका – कुंडलीतील चंद्र बलवान नसल्यास काय परिणाम होतात?
उत्तर- चंद्र म्हणजे मन. भावना कुंडलीत चंद्र दोषयुक्त असल्यास, बलवान नसल्यास मित्र अथवा अशुभ ग्रह सोबत नसल्यास, अशुभ ग्रहांची दृष्टी असल्यास, चंद्र राहू अथवा केतू सोबत असल्यास, चंद्र षष्ठ अष्टम द्वादश भावात असल्यास यापैकी काही असल्यास मानसिक त्रास होणे, भावनांची गुंतागुंत होणे, सदैव विचारात अडकलेले असणे, काल्पनिक दुःख उभे करणे, मूळ संकटा पेक्षा अधिक मोठे संकट मनात तयार करणे, ताबडतोब गैरसमज करून घेणे, गैरसमज करून देणे, सदैव नकारात्मक विचार, अंधाऱ्या खोलीत बसणे, एकांतात राहणे, कोणाशी मोकळे ना बोलणे, असे परिणाम दिसू शकतात.
प्रश्न खैरनार – रत्न व उपरत्न यात काय फरक असतो?
उत्तर- मूळ रत्नांमध्ये अधिक क्षमतेने उर्जा लहरी असतात. याउलट उपरत्न मध्ये या ऊर्जा लहरींचा अभाव असतो. मूळ रत्नांची जडणघडण काठिण्य चुंबकीय ऊर्जा लहरी यांचा परिणाम अधिक असतो. मूळ रत्नांची पैलू पाडून घेण्याची क्षमता देखील अधिक असते. याउलट उपरत्न हे ओबडधोबड, कमी कठीण असलेले, उर्जा लहरींचा अभाव असलेले पैलूदार नसलेले असते. आपल्या वैशिष्ट्यांमुळेच मूळ रत्नांच्या किमती या उपरत्न पेक्षा कितीतरी अधिक असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या शक्य असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने मूळ रत्न वापरावीत.
वास्तु टीप-
वास्तूमध्ये WINDCHIME अर्थात पवन घंटी अवश्य लावावी, परंतु तिच्या BELLS या पाच, सात, नऊ, अकरा अशा विषम संख्येत असाव्यात. प्रत्येक बेलचा आवाज हा निराळा असावा.
वाद्य टीप-
वास्तूमध्ये तुटलेली वाद्य ठेवू नयेत. फुटका तबला, STRING, तुटलेले गिटार अथवा सतार, फुटलेले बोंगो, बंद पडलेली पेटी, हर्मोनिका अशी वाद्य दुरुस्त करूनच घरात ठेवावीत.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असल्याने शुभ कार्य टाळावीत.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.