आजचे राशीभविष्य – गुरुवार – १ ऑक्टोबर
मेष- अवलंबून राहू नका
वृषभ- श्रमाचे चीज होईल
मिथुन- झाकली मूठ राहू द्या
कर्क- धनप्राप्ती
सिंह- कुटुंबात सामंजस्याचे वातावरण
कन्या- लहान-सहान गोष्टी सोडून द्या
तूळ- दगदग
वृश्चिक- संधी चालून येईल
धनु- तब्येतीकडे दुर्लक्ष नको
मकर- व्यवसाय प्रगती
कुंभ- भागीदारी सांभाळा
मीन- अकस्मात खरेदी
……
शंकासमाधान
प्रश्न संगीता- एक ग्रह किती काळ एका राशीला असतो?
उत्तर- यामध्ये सर्वाधिक काळ शनि तीस महिने एका राशीला असतो. ज्याला आपण साडेसातीचा मध्यान काळ म्हणजेच मधली अडीच की असे म्हणतो. तर गुरु ग्रह तेरा महिने एका राशीला असतो. यामध्ये ज्या राशींना चौथा, आठवा, बारावा, गुरू असतो त्या या राशींना तेवढ्या तेरा महिने पुरते शुभ कार्यासाठी गुरुबळ नाही असे म्हटले जाते.
प्रश्न रयना – आम्ही फार्म हाऊस बांधले आहे. परंतु तेथे जाऊन राहण्यास उत्साह वाटत नाही?
उत्तर- आपण पाठवलेल्या वास्तू प्लॅन प्रमाणे फार्म हाऊसमध्ये दक्षिण-पश्चिम नैऋत्य या भागामध्ये अधिक ओपनिंग झालेले आहेत. त्यामानाने उत्तर पूर्व ईशान्य भाग बराचसा बंद आहे. वास्तूच्या उत्तर पूर्व ईशान्य या शुभ ऊर्जेच्या दिशा असतात. तर दक्षिण पश्चिम नैऋत्य या नकारात्मक दिशा असतात. वास्तूची चंद्रनाडी ही सूर्यनाडी पेक्षा अधिक सक्रीय हवी. आपण आपल्या दक्षिण-पश्चिम नैऋत्येकडील सातपैकी चार ओपनिंग बंद कराव्यात. उत्तर पूर्व ईशान्यकडे चार ओपनिंग वाढवाव्यात. मुख्य प्रवेश पूर्व दिशेच्या महेंद्र अथवा सत या दरवाजातून घ्यावा. अग्नेय दिशेला झालेली पाणथळ जागा बंद करावी. म्हणजे वास्तूचे विपरीत अग्नी तत्व सुधारेल.
प्रश्न सौ मडावी- भद्राक्ष म्हणजे काय?
उत्तर- रुद्राक्ष सारखेच दिसणारे परंतु रुद्राक्ष नाही, असे फळ म्हणजे भद्राक्ष. बरेचदा अधिक मुखाच्या रुद्राक्षांची कमतरता बघता, असे भद्राक्ष रस्त्यावर विक्रीसाठी येतात. दुर्मिळ रुद्राक्ष हा वजनाने जड रवेदार आकर्षक असतो. तर भद्राक्ष हलका तितकाच आकर्षक नसतो. बरेच वेळा भद्राक्ष पॉलिश केलेली असतो. किंवा थेट माळेमध्ये गुंफून विक्री केले जाते. दुर्मिळ रुद्राक्ष खरेदी करताना सर्टिफिकेटसह घ्यावा.
रत्न टीप-
पैलूदार झिरकॉन अथवा हिरा या शिवाय कोणतेही रत्न मूरणीमध्ये वापरू नये.
वास्तू टीप-
वास्तूमध्ये उत्तर दिशेला मुख्य दरवाजा येणे शक्य नसल्यास उत्तर दिशेच्या लांबीचे सामान उभा करून त्यातील पाचव्या भागात सव्वा फूट बाय तीन फूट आरसा लावावा.
माळ टीप-
हळद माळ खरेदी करताना त्यातील पोकळ तसेच कीड लागलेले माळेचे मणी तपासून घ्यावे. हळद माळ जपासाठी वापरू नये.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असल्याने शुभ कार्य टाळावीत.
…………………
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.