आजचे राशीभविष्य – गुरुवार – २४ सप्टेंबर
मेष- किरकोळ कुरबुरी
वृषभ- येरे माझ्या मागल्या
मिथुन- अंदाज चुकू शकतात
कर्क- जुन्या हितचिंतकांच्या भेटी
सिंह- OUT OF SIGHT. OUT OF MIND तत्व ठेवा
कन्या- “दो पल के जीवन से एक उमर चुरानी हे”… अर्थात संधी ओळखा
तूळ- “गुरूही गोविंद तक पोहोच आयेगा” अर्थात योग्य मार्गदर्शनाची गरज
वृश्चिक- भावनिक तणाव निवळेल
धनु- ज्येष्ठांची मर्जी सांभाळा
मकर- जुनी येणी येतील
कुंभ- मान सन्मान
मीन- हेलपाटा टाळा
……….
शंका-समाधान
प्रश्न मोडक – वास्तूमध्ये कोणत्या प्रकारचे ऊर्जा प्रवाह असतात?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूमध्ये चंद्र प्रवाह व सूर्य प्रवाह असतात. त्यामध्ये अग्नेय दिशेला पासून वायव्य पर्यंत एक तिरपी रेषा काढली तर वास्तूच्या कार्पेट एरिया चे दोन त्रिकोणात रूपांतर होते. ब्रह्म तत्वात पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताचा त्रिकोण हा चंद्रनाडी प्रवाह तर उजव्या हाताचा त्रिकोण हा वास्तूची सूर्यनाडी प्रवाह दर्शवतो.
प्रश्न उर्जिता- किती मुखापर्यंत रुद्राक्ष असतात?
उत्तर- १ ते २१ मुखापर्यंत रुद्राक्ष असतात. जेवढे मुख जास्त तेवढे ते रुद्राक्ष दुर्मिळ असतात.
प्रश्न सुहास- बेसमेंटला कोणता व्यवसाय करू?
उत्तर- कोणत्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी भरपूर वायुवीजन, नैसर्गिक प्रकाश, तसेच ऊर्जा लहरींचे योग्य प्रवाह आवश्यक असतात. या सर्व गोष्टी बेसमेंटला तेवढ्या प्रमाणात मिळणे शक्य नसते. म्हणून शक्यतो बेसमेंटचा वापर गोडाऊन म्हणून करावा.
…
वास्तु टीप-
स्वतंत्र वास्तू बांधताना जिना उत्तर-पूर्व ईशान्येला न घेता दक्षिण-पश्चिम नैऋत्य अथवा वायव्येला घ्यावा.
…
देव्हारा टीप-
देवपूजेमध्ये स्फटिक अथवा पंचधातू श्रीयंत्र अवश्य असावे.
…
रत्नटीप-
पैलूदार रत्न खरेदी करताना रत्नाचे सर्व पैलू CUTS हे समान आकारात आहेत की नाही तसेच त्यां चे REFLECTION समप्रमाणात आहे की नाही. स्वतः EYEGLASS मध्ये नैसर्गिक उजेडात पहावे.
…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असल्याने शुभ कार्य टाळावीत..

…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Nice