आजचे राशीभविष्य – गुरुवार – २८ जानेवारी २०२१
मेष – कामे वेळेत पार पडतील
वृषभ – वाद टाळा
मिथुन – गोड बोलून कार्यभाग साधा
कर्क – अनपेक्षित आव्हाने
सिंह – विरोधकांच्या कारवाया मंदावतील
कन्या – संधी चालून येईल
तूळ – सुसंवाद शिवाय पर्याय नाही
वृश्चिक – उत्पन्नाचे नवीन प्रस्ताव येतील
धनु – वादग्रस्त प्रकरणात सहभाग टाळा
मकर – मानसिक ओढाताण
कुंभ – प्रलोभनांपासून दूर राहा
मीन – उत्साह कार्यान्वित करा.
……..
शंकासमाधान
प्रश्न- तुषार – आज गुरुपुष्यामृत योग आहे. बरेच लोक पुष्कराज खरेदी करतात. याबद्दल मार्गदर्शन करावे.
उत्तर- रत्न ज्योतिष शास्त्राप्रमाणे अन्य रत्नांप्रमाणेच पुष्कराज देखील एक रत्न आहे. जसे बाकी रत्न धारण करण्याबद्दल काही नियम तसेच सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम आहेत. तसेच पुष्कराज धारण करण्याबद्दल पण आहे. प्रत्येकालाच पुष्कराज रत्न आवश्यक आहे, असे अजिबात नाही. कुंडलीतील गुरु ग्रहाचे स्थान, त्यासोबत अशुभ ग्रहांच्या युती, अशुभ ग्रहांच्या दृष्टी, हस्तरेषेप्रमाणे तर्जनी बोटा खालील उंचवट्यावर रेषांची स्थिती, त्यावरील शुभाशुभ चिन्हे या सर्वांचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुष्कराज धारण करावा. फॅशन म्हणून कोणतेच रत्न घेऊ नये. पुष्कराज गुरुचे रत्न आहे. त्यामध्ये सिलोनी पुष्कराज हा त्यामानाने महाग तर बँकोक पुष्कराज हा थोडा स्वस्त असतो. पुष्कराज रत्न सोन्यात तसेच तर्जनी या गुरु प्रभावाच्या बोटात धारण करतात. पुष्कराज सोबत नीलम, गोमेद, हिरा, पन्ना ही रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय धारण करू नये. पुष्कराज घेताना सर्टिफाइड घ्यावा. नॉन हिटेड, नॉन ट्रिटेड असावा. रिकट रिपॉलिश नसावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपणास किती कॅरेटचा गरजेचे आहे ते ठरवावे. पुष्कराज धारण सिद्ध करण्याची विधी पद्धत समजून घ्यावी. पुष्कराज रत्न काढून ठेवू नये. दुसर्यास धारण करण्यास देऊ नये. दुसऱ्याचे घालू नये. तज्ञांच्या सल्ल्याने चार ते साडेचार वर्ष पुष्कराज धारण केला जातो. अन्य रत्नांप्रमाणेच पुष्कराजची किंमत ही त्याच्या प्रकार, क्लॅरिटी व कॅरेटवर ठरते. जेवढे कॅरेट व क्वॉलिटी जास्त, तेवढी किंमत अधिक असे सूत्र असते.
….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.