आजचे राशीभविष्य – गुरुवार – २१ जानेवारी २०२१
मेष – सबुरीने घ्या
वृषभ – ज्येष्ठांकडून सन्मान
मिथुन – जुना मित्र परिवार भेटेल
कर्क – कौटुंबिक समस्यां वाढू देऊ नये
सिंह – अनपेक्षित पाहुणे येतील
कन्या – गोड-धोड खायला मिळेल
तूळ – मध्यम भूमिका फायद्याची
वृश्चिक – धार्मिक विधींची लगबग
धनु – व्यवसायिक समस्यांमध्ये पूर्वानुभव वापरा
मकर – तब्येत सांभाळा
कुंभ – पित्ताचा त्रास संभवतो
मीन – आर्थिक व्यवहार सांभाळून करा.
…….
शंकासमाधान
प्रश्न- विश्वंभर – कुंडलीतील नाडी म्हणजे काय?
उत्तर – विवाह ठरवताना अष्टकूट मिलन केले जाते. म्हणजे आठ प्रकारचे घटक ज्योतिष शास्त्रानुसार तपासले जातात. त्यांना गुण दिले जातात. एकूण छत्तीस गुण असतात. प्रत्येक घटकाला भिन्न गुण दिला जातो. त्यातीलच एक घटक म्हणजे नाडी होय. नाडीसाठी सर्वाधिक आठ गुण दिले जातात. एवढे नाडी महात्म्य आहे. आद्य नाडी, मध्य नाडी, अंत्य नाडी अशा तीन प्रकारच्या नाडी ज्योतिष शास्त्र मध्ये असतात. वधू-वरांची नाडी एकच असेल तर नाडी दोषाचे आठ गुण वजा होतात. तर भिन्न नाडी असल्यास आठ गुण मिळवले जातात. याबाबत ज्योतिष तज्ञांची भिन्न मते आढळतात. एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येकी नऊ नक्षत्रांना एकसमान नाडी असते. उदाहरणार्थ, आद्य नाडी मध्ये अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, मूळ, शततारका, पूर्वा भा, उत्तरा, हस्त, ज्येष्ठा ही नक्षत्रे येतात. तर मध्य नाडीमध्ये भरणी मृग, पुष्य, पूर्वा शा, धनिष्ठा, उत्तरा भा, पूर्वा, चित्रा, अनुराधा ही नक्षत्रे येतात. तर अंत्य नाडी मध्ये कृतिका, रोहिणी, अश्लेषा, उत्तर षा, श्रावण, रेवती, मघा, स्वाती, विशाखा ही नक्षत्रे येतात. यातील आद्य नाडी ही वात प्रवृत्तीचे द्योतक आहे. मध्य नाडी ही कफ प्रवृत्ती तर अंत्य नाडी ही पित्त प्रवृत्ती मानली गेली आहे.
…….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.