आजचे राशीभविष्य – गुरुवार – ३१ डिसेंबर २०२०
मेष- जुने येणे येतील
वृषभ- सल्ला ऐकणाऱ्यांना द्या
मिथुन- दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची
कर्क- कौटुंबिक वाद वाढवू नये
सिंह- तू दिले थोडे मी दिले घोडे
कन्या- तब्येतीबद्दल बेफिकिरी नको
तूळ- पर्यायी छोटे व्यवसाय फायद्याचे
वृश्चिक- अतिथि तुम कब जाओगे असे होईल
धनु- एकदा न ऐकणाऱ्यांना परत सांगू नये
मकर- अनपेक्षित शुभवार्ता
कुंभ- धार्मिक कार्य घडेल
मीन- एकाग्रता गरजेची.
………..
शंकासमाधान
प्रश्न- प्रजापती – हनुमान भक्तांना शनीपिडा होत नाहीत याबाबत पौराणिक कथा काय आहे?
उत्तर- रावणाचा पुत्र मेघनाथ याचा जन्माच्या वेळी शनी ग्रह बलवान नव्हता. त्यामुळे मेघनाथ याला अमरत्वाचा आशीर्वाद प्राप्त झाला नाही. कुंडलीतील शनी हा श्वासाचे प्रतीक आहे. याचा राग येऊन रावणाने शनीला बंदी बनवून लंकेमध्ये जखडून ठेवले. ज्यावेळी हनुमान सीता शोध करत लंकेमध्ये आला त्यावेळी त्याने आपल्या रुद्र बळाने शनीची मुक्तता केली. परंतु आपल्या भक्तांच्या वाटेला न जाण्याची ताकीदही दिली. त्यामुळे हनुमान भक्तांना शनीपिडा देत नाही अशी पौराणिक मान्यता आहे.
…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.