आजचे राशीभविष्य – गुरुवार – २४ डिसेंबर २०२०
मेष- आरोग्याच्या कुरबुरी
वृषभ- व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतील
मिथुन- नेत्र पिडा
कर्क- नूतन वास्तू विषयक दगदग
सिंह- अनपेक्षित खर्च
कन्या- दोलायमान मनस्थिती
तूळ- व्रतवैकल्य
वृश्चिक- कौटुंबिक कुरबुर
धनु- जनसंपर्काचा फायदा
मकर- खर्च टाळा
कुंभ- वादग्रस्त प्रकरण काळजीपूर्वक हाताळा
मीन- वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
……..
शंकासमाधान
प्रश्न- देशमुख – तीन मजली घर आहे त्या तीन भावांनी वास्तुशास्त्राप्रमाणे कसे राहावे?
उत्तर- तीन मजली घर असल्यास सर्वात ज्येष्ठ भावाने तळमजल्यावर राहावे नंबर दोन च्या भावाने मधल्या मजल्यावर राहावे लहान भावाने सर्वात वरच्या मजल्यावर राहावे.
……….
प्रश्न- रवींद्र – मूलांक म्हणजे काय?
उत्तर- या तारखेला आपला जन्म झालेला असतो तारीख म्हणजे आपला मुलांक होय परंतु त्यातही दोन अंकी जन्मतारीख असल्यास त्या दोन संख्यांची बेरीज करून त्यातून येणारी एकल संख्या हा मूलांक असतो. उदाहरणार्थ जन्म जर 1-10-19-28 या तारखांना झाला असेल तर या सर्वांचा मूलांक एक आहे असे समजावे. प्रत्येक मुलांका चा एक स्वामी ग्रह असतो त्या ग्रह स्वामी प्रमाणे तो मुलांक असणाऱ्या व्यक्ती बाबत मुलांक शास्त्राप्रमाणे काही अंदाज केले जातात. उदाहरणार्थ 1 मुलांक असणारे लोक हे रवी प्रवृत्तीचे असतात. त्यांचा लोकसंग्रह मोठा असतो. कोणत्या विषयाचा व्यासंग व अभ्यास चिंतन-मनन हे लोक deeply करतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात. नोकरी करणे अमलाखाली काम करणे हा यांचा स्वभाव नसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांचा लोकसंग्रह असतो. दिलदार प्रवृत्तीचे असतात प्रसंगी स्वतः अडचण काढून गरजूंना मदत करतात. त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. या लोकांशी वाद घालण टाळावे. अतिशय खिलाडूवृत्तीने राहतात परंतु संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम करतात. आपला एक तरी मित्र- सल्लागार हा मूलांक एक चा असावा असे म्हणतात. सर्वांना संधी देणे सर्वांना सोबत घेऊन चालणारे या लोकांचे स्वतःच दुःख भावना हे कधीही प्रकट करत नाहीत.
….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
—
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.