आजचे राशीभविष्य – गुरुवार – ३ डिसेंबर २०२०
मेष- व्यवसायिक गुपिते उघड करू नका
वृषभ- असंगाशी संग करू नये
मिथुन- नवीन क्षेत्रात सातत्य गरजेचे
कर्क- मोठा निर्णय साठी महत्त्वाचा महिना
सिंह- झालेली चूक रेटून नये
कन्या- धन्यवाद अपेक्षा नको
तूळ- नजर बदला परिस्थिती बदलेल
वृश्चिक- काल्पनिक समस्या उभ्या करू नयेत
धनु- जेवायला ताट द्या पण बसायला पाट नको
मकर- मुठीने दान करा ओंजळीने नको
कुंभ- संपूर्ण सकारात्मकता फायद्याची
मीन- व्यवसायिक विविधतेचा व्यासंग वाढवा.
…………
शंकासमाधान
प्रश्न- मीनल – माणिक रत्न कुणी वापरावे?
उत्तर- कुंडलीत रवी अशुभ ग्रह युक्त असेल तर. रवि राहू अथवा केतू युतीमध्ये असेल तर. रवी षष्ठम अष्टम अथवा द्वादश भावात असेल तर. रवी अशुभ ग्रहांच्या नवपंचम योगात असेल तर. शिवाय निर्णय घेण्याचे धाडस कमी असते. आत्मविश्वासाचा अभाव. नकारात्मक मानसिकता. याचा सुद्धा संबंध रवी अथवा माणिक रत्नाशी येतो. झांबिया सिलोन पोटा न्यू बर्मा प्रकारातील क्लिअर पीस चार कॅरेट माणिक OVAL आकाराचा तांबे या मेटल मध्ये वापरतात. महिला वर्गाने माणिक वापरायचा असल्यास MARKIS SHAPE निवडावा. हस्तरेषा यांच्या आधारे रवी माउंटन वर हॅज अथवा क्रॉस असेल तर किंवा रवी लाईन अर्धवट तुटक तसेच रवी लाईनवर क्रॉस हेज ब्लॅक डॉट असेल तरी माणिक वापरण्याचा सल्ला दिला जातो.. वास्तूमध्ये पूर्व दिशा वास्तु दोष प्रसंगी माणिकचा वापर करतात.
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.