प्रश्न – पल्लवी – गणपती उत्सवात आम्हाला गौरी-महालक्ष्मी बसवण्याचे व्रत सुरु करायचे आहे. त्यासाठी काय करावे
उत्तर – गणपती उत्सवातील गौरी व्रत सुरु करण्याचे पूर्वापार काही नियम आहेत. मुख्यतः आपल्या परिचित कुणाकडून तरी गौरी व्रत आपल्याकडे घ्यावे लागते. बऱ्याच वेळा काही कुटुंबांमध्ये त्यांच्याकडील गौरी व्रत काही कारणाने पुढे सुरू ठेवणे शक्य नसते, अशा कुटुंबांकडून गौरी व्रत आपणास मिळू शकते किंवा काही कुटुंबांनी अकरा किंवा एकवीस वर्ष गौरी व्रताचा संकल्प केलेला असतो. त्यानंतर ते व्रत पुढे चालवण्यास आपण घेऊ शकतात. अशा कुटुंबांकडे आपण स्वतः जाऊन त्यांना विनंती करावी. त्यांची संमती असल्यास गौरी गणपती सणाच्या किमान सव्वा महिना अगोदर त्यांचेकडील गौरी मुखवटे आपल्या पदरात घ्यावे. हे व्रत गौरींच्या सर्व व्रतवैकल्यासह “मी पण अखंडपणे पुढे चालू ठेवेल “असा शब्द त्यांना द्यावा. त्यानंतर हे गौरी मुखवटे आपल्या घरी सन्मानपूर्वक आणावे.
घरात प्रवेश केल्यानंतर त्यांची यथासांग पूजा करावी. अनुक्रमे गहू व तांदूळ आणि त्यांची ओटी भरावी. त्यांच्या मुखवट्याला जर तीन वर्ष पूर्ण झालेले असतील तर आपण आपल्या पसंतीचे दुसरे मुखवटे घेऊ शकता. त्यांच्याकडील गौरीच्या साज-शृंगाराच्या सर्व वस्तू बदलून आपण नवीन घ्याव्यात, अशी पूर्वापार प्रथा आहे. परंतु एकदा पदरात घेतलेले गौरी व्रत आपणास जोपर्यंत मागणी करणारे दुसरे कुटुंब मिळत नाही तोपर्यंत अखंड करावे लागते, हे लक्षात असू द्यावे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे गौरींना साडी नेसवण्याची कला त्वरित शिकून घ्यावी. कारण ऐनवेळी सणासुदीत मदतीला कुणी मिळेल ही शक्यता नसते. त्याचप्रमाणे गौरी जेवतात त्यादिवशी परिचित एखाद्या कुटुंबास जेवणाचे आमंत्रण अवश्य देऊन ठेवावे. गौरी बसवण्याचे तीन दिवसाचे सर्व नियम आधीच्या कुटुंबाकडून व्यवस्थित समजून घ्यावे. कुणाकडूनही न मिळता आपण स्वतः गौरी व्रत सुरू करू नये, असा शास्त्रार्थ आहे.
…….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!