उत्तर – विवाहासाठी कुंडली बघतांना मृत्यू षडाष्टक योग असेल तर विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो. याउलट प्रीती षडाष्टक योग असेल तर विवाह करण्याचा सल्ला दिला जातो. मृत्यू षडाष्टक योग असल्यास वधू-वरांच्या कुंडलीतील एकही गुण जुळत नाही. याउलट प्रीती षडाष्टक योग असल्यास वधू-वरांच्या राशीतील नक्षत्रापैकी एखादे नक्षत्र सोडल्यास बाकी नक्षत्र जोड्यांचे गुण हे १९ पेक्षा जास्त येतात. म्हणून प्रीती षडाष्टक असल्यास राशीच्या विवाह करण्याचा सल्ला दिला जातो.
(मेष वृश्चिक)( वृषभ तुला)( मिथुन मकर)( कर्क धनु )(सिंह मीन)( कन्या कुंभ) या राशीच्या जोड्या प्रीती षडाष्टक मध्ये येतात. ज्याप्रमाणे ठराविक राशींच्या जोड्या या मित्र किंवा शत्रू गटात येतात, त्याचप्रमाणे राशींचे स्वामी असलेले ग्रह यांचे देखील दोन गट पडतात. त्यामध्ये रवी, मंगळ, चंद्र, गुरु हे सकारात्मक ग्रह एका गटात येतात. तर शनि, शुक्र, बुध, राहू-केतू हे नकारात्मक ग्रह मानले जातात. ते एका गटात येतात. वधू-वरांच्या कुंडलीचे ग्रह मिलन करताना दोघांच्या कुंडलीतील प्रत्येक घरातील राशींचे स्वामी हे परस्परांचे शत्रू व मित्र आहेत हे पाहिले जाते. त्यावरून सरासरी काढली जाते. त्यातही केंद्रातील ४ घरे त्याचप्रमाणे ६, ८, १२ ठिकाणचे राशीस्वामी या घरांना विशेष महत्त्व दिले जाते.
…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!