आजचे राशिभविष्य – बुधवार – ३० सप्टेंबर
—
मेष – परिस्थितीशी मुकाबला
वृषभ- प्रकृतीकडे दुर्लक्ष नको
मिथुन- यशाने भारावून जाऊ नये
कर्क- तडजोड फायद्याची
सिंह- खुद को कर बुलंद इतना
कन्या- मनसुबे पूर्णत्वास
तूळ- एकला चलो रे
वृश्चिक- अनपेक्षित समस्या
धनु- सल्लामसलत
मकर- हवे ते साध्य होईल
कुंभ- विचार योग्यरीत्या मांडा
मीन- विजय पताका
……..
शंकासमाधान
प्रश्न सौ घमंडी – कुंडलीतील मंगळ या विषयावर अनेकदा समज गैरसमज होतात. माझ्या मुलीच्या पत्रिकेला मंगळ आहे का?
उत्तर- आपल्या मुलीच्या पत्रिकेला कोणत्याही प्रकारचा मंगळ नाही. कुणाचाही पत्रिकेतील प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम व द्वादश भावात मंगळ ग्रह असल्यास त्या पत्रिकेला मंगळ आहे असे म्हणतात. मंगळाबाबतीत अनेकदा साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार होतो. मंगळाच्या कुंडलीचा बागुलबुवा करण्यात येतो. विविध कारणाने पत्रिकेतील मंगळ निर्बली किंवा निस्तेज होतो. उदाहरणार्थ मंगळ रवि सोबत असल्यास, मंगळ कर्केचा असल्यास, शत्रु गृहीचा म्हणजेच मिथुन किंवा कन्या राशीचा, प्रथम भावात मेष राशीचा चतुर्थ भावात, वृश्चिकेचा सप्तमात, मकरेचा अष्टमात, सिंहेचा द्वादश भावात, धनु राशीचा मंगळ निर्दोष असतो. मंगळावर शुभ ग्रहाची पूर्ण दृष्टी असल्यास तो सौम्य होतो.
प्रश्न पवन – कोण कोणत्या प्रकारचे दोष कुंडलीतून पाहिले जातात?
उत्तर- एक नाडी दोष ,जन्म नक्षत्र दोष, एक चरण दोष, योनी मैत्री दोष, ग्रहमैत्री दोष, मनुष्य राक्षस दोष, कुट दोष, नूदूर दोष असे आठ प्रकारचे दोष कुंडलीतून आपणास बघता येतात.
प्रश्न शलाका- नियमित भीतीदायक स्वप्न पडण्याचे काय संकेत असेल?
उत्तर- कुंडलीतील चंद्र हा मनाच्या अवस्थेचा प्रतीक आहे. तसेच कुंडलीतील वायव्य दिशा तसेच मूळ वास्तूची वायव्य दिशा यातील दोष हे देखील मनाच्या अवस्था दर्शवतात. आपल्या कुंडलीतील चंद्र हा केतू युक्त असून कुंडलीतील वायव्य दिशा तसेच मूळ वास्तूची वायव्य दिशा यातील दोष हे देखील मनाच्या अवस्था दर्शवतात. आपल्या कुंडलीतील चंद्र हा केतू युक्त असून कुंडलीतील वायव्य दिशा देखील दोष युक्त आहे. वास्तू प्लॅन प्रमाणे वायव्येला देवघर आहे. कोणत्या गोष्टीचा अती विचार करणे, भूतकाळातील कुठलाही वाद डोक्यात न ठेवणे, कुणाबद्दलही पूर्वग्रह बाळगू नये. आपल्या सोबत घडलेल्या कोणत्याही घटनेचा साधा व सोपा अर्थ लावणे, सतत गैरसमज करून घेणे, अशा सकारात्मक सवयींनी आपल्या या समस्येवर मात करता येऊ शकते.
—
वास्तू टीप-
वास्तूच्या दक्षिण-पश्चिम तसेच नैऋत्य दिशेस हलक्या वजनाच्या वस्तू ठेवू नये.
रत्न टीप-
कोणत्याही रत्नाच्या युतीसोबत हिरा रत्न घालताना त्याची रचना वरील बाजूस करावी.
पूजा टीप-
नारळ फोडताना त्यात कोंब निघाल्यास तो नारळ खाऊ नये. समईच्या वाती लावताना विषम संख्येत लावाव्यात.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असल्याने शुभ कार्य टाळावीत..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे