आजचे राशिभविष्य – बुधवार – २३ सप्टेंबर
मेष – शब्द पाळण्याचा दिवस
वृषभ – किरकोळ प्रकृती चिंता
मिथुन – नो शोर्टकट फोर सक्सेस
कर्क – बोलून तर गेलात आता नका विचार करू
सिंह – शाब्दिक हल्ले परतवून लावाल
कन्या – आप्तेष्टांची फोनवर बोलावेसे वाटेल
तूळ – कला जोपासावी
वृश्चिक – निसर्गात रमाल
धनु – नवीन पाककृती मस्त जमून येईल
मकर – हर फिक्र को अपनी किस्मत मत समझो
कुंभ – गृह सजावट करा
मीन – परिचितांकडून अनपेक्षित गोड बातमी
…..
शंकासमाधान
प्रश्न विश्वजीत – मी तीन वेळा मोठ्या अपघातातून वाचलोय. काय संकेत असावा?
उत्तर- कुंडलीतील योगाप्रमाणे बलवान रवी मुळे आपल्या दारातला गंडांतर योग घरात आला नाही. आपण केलेल्या पुण्यकर्माचीच ही फलश्रुती होय. इथून पुढे ईश्वरीय शुभ संकेत समजून इतरांना आनंद देण्यासाठी कार्यरत रहा. यायोगे तुमचे जीवन पण आनंदाने भरून जाईल.
प्रश्न राजकिशोर – माझ्या स्वतंत्र वास्तूचे बांधकाम सुरू करायचे आहे. कोणत्या दिशेचा दरवाजा शुभ राहील?
उत्तर- योग्य ते वायूवीजन भरपूर नैसर्गिक प्रकाश स्वच्छ सभोवताल यासोबतच वास्तूमध्ये राहणाऱ्यांचा एकमेकांवरचा विश्वास येईल. त्या परिस्थितीशी सकारात्मकपणे सामोरे जाण्याची शुभऊर्जा असेल तर कोणत्याही दिशेचे प्रवेशद्वार आपली चौफेर प्रगती करेल.
प्रश्न मनोज- माझे परिचित लोक माझ्या प्रगतीवर जळतात असे का होते?
उत्तर- सर्वप्रथम आपले चंद्रबल कमी असल्याने भेटेल त्याच्याबाबत STAMPING करण्याचा स्वभाव सोडून द्यावा. म्हणजे तुम्हाला स्वतःला मानसिक त्रास होणार नाही. आपल्या कृती व विचाराचा परिस बनवा. म्हणजे आसपास सोन्याचे भाव किती चढले गडगडले तरी तुम्ही स्थितप्रज्ञ रहाल.
वास्तु टीप-
वास्तूचे आकाश तत्व म्हणजे ROOF गडद रंगसंगती करू नये.
गृह टीप
पश्चिम नैऋत्य वायव्य उत्तर या देशांना डोकं करून झोपू नये..
देव्हारा टीप
घरामध्ये हनुमानाची प्रतिमा लावताना गदाधारी उभा वीर हनुमानाची हवी. सप्ताहात किमान एका गरजू व्यक्तीला फळ दान अथवा अन्नदान करून शुभ आशीर्वाद मिळावेत.
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असल्याने शुभ कार्य टाळावीत
…………………..
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.