पुणे – कोरोना विषाणू संसर्ग जोपर्यंत पूर्णपणे संपुष्टात येत नाही, आणि विद्यापीठ, प्राध्यापक आणि सर्व घटकांची मानसिकता होत नाही, तोपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार असल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात असून, जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पावती दाखवल्यास, प्रवेश दिला जात असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, कोविड पूर्णतः जात नाही आणि विद्यापीठांचे, प्राध्यापकांचे आणि सगळ्याच घटकांची मानसिकता फिजीकली एक्झाम द्यायची होत नाही, तोपर्यंत ऑनलाईन एक्झामच घेतल्या जातील. जात पडताळणी प्रमाणपत्र जर सबमिट केलेलं असेल आणि त्याची पावती त्या विद्यार्थ्याकडे असेल ते देखील ॲडमिशनला ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि काही कालावधीनंतर त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागेल.