नाशिक – गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील भाजीबाजार अखेर सुरू झाला आहे. १४४ ओटे भाजी विक्रेत्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भाजीबाजाराची इमारत महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली. मात्र, त्यातील ओटे भाजी विक्रेत्यांना उपलब्ध करुन देणे आणि भाजी बाजार सुरू करण्याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप केला जात होता. अखेर हे ओटे विक्रेत्यांना देऊन भाजीबाजार सुरू करण्यात आला आहे. या भाजीबाजारावरुन राजकीय पक्षांमध्ये मतभेद तसेच वादविवाद सुरू होते. मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, भाजप नगरसेविका स्वाती भामरे, दीपक चव्हाण, बाळासाहेब अहिरराव, बंडू सोनवणे, आबा गांगुर्डे, संतोष धोंगडे, निवृत्ती कडलग, लक्ष्मण शिंदे, सचिन पाटील यांनी शनिवारी ओट्यांचे वितरण करत भाजीबाजार सुरू केला.