दिंडोरी – गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. विशाल शिवाजी कोरडे असे मृत युवकाचे नाव आहे. नाभिक समाजाचे युवक कार्यकर्ता असलेला विशाल हा सकाळी पाणीपुरवठ्यावेळी रो हाऊसच्या वर असलेल्या टाकीची पाहणी करण्यासाठी गेला. टाकी भरल्याचे लक्षात आल्यावर त्याने आईला आवाज दिला. आई टाकी भरली पण त्याचा हा आवाज शेवटचा ठरला.
यावेळी गॅलरीतून तोल गेल्याने तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागून अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचे निधन झाले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले. नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते शिवाजी कोरडे यांचा तो मुलगा होता. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निर्मला विहार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.