शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

“आई कुठे काय करते”..!

by India Darpan
सप्टेंबर 15, 2020 | 9:30 am
in इतर
0
download 4

“माझं बाळ माझं बाळ म्हणत हाडाची काड करते.,
लेकराबाळांच्या सुखासाठी रात्रंदिन मरमर मरते..!
उठल्यापासुन झोपे पर्यंत सर्व कामे आई करते..,
आणि जन्म दिला म्हणून आपले संगोपन करते.
बसं एवढचं ना..!
अगदी बरोबर..मग जावून का नाही विचारत एखाद्या आई विना अनाथ मुलाला..?
की,जीवनात..
“आई कुठे काय करते”..?
पण मित्रांनो,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आईच आपल्या घराचा,जीवनाचा,परिवाराचा खरा आधारवड असते.
आईच आपल्या सुखाचं पहिलं आणि शेवटचं पानं असते.आईच आपल्या आयुष्यातील सकाळच्या व संध्याकाळच्या अडीच इंच भुकेतील पोटाचा अग्नी शांत करणारी चूल असते.आईच घरातल्या प्रत्येकासाठी निर्वीवादपणे केलेली प्रार्थना स्वकीयांसाठी समर्पीत करणारी निस्वार्थी गृहीणी असते.आईच नवरा आणि सासू यांंच्यातील जोडणार्या सेतूवर अगदी तारेवरील कसरत करण्याईतपत कठोर प्रवास असूनही त्यातही अगदी सहजतेने समतोल राखत आपला संसार सर्वांच्या आपुलकीने फुलवणारी राणी असते.आईच कुरूपता धारण करून प्रत्येक क्षणाला विचार बुद्धीने सौंदर्य प्राप्ती करणारी युनिव्हर्स असते.आईच पहाटे समयी धरणी मातेला सडा घालून तृप्त करणारी गृहदेवता असते.आईच धरणीमातेला रांगोळी घालून सौंदर्याचा एक पवित्र ठेवा बहाल करून पहाटेच्या कोवळ्या काळोखात लुप्त जाणारी चांदणी असते.आईच प्रत्येक लेकराच्या मनातलं ओठांवर येण्याआधी मायाळू नजरेन हेरलेलं मुखात घालवणारी वात्सल्य मूर्ती असते.
हो..खरचं तिच्यामुळेच आपल्या सिमेंटच्या, पत्राच्या, मातीच्या गोकुळाला प्राण असतो.
तुमच्या मते,भलेही सकाळचा सूर्य आकाशात उजडत असेल.परंतु आपल्यासाठी तीच आनंदाने प्रत्येक सकाळ उजाडणारी,तळपणारी सूर्यदायिनी असते.
जसं खाण्याच्या प्रत्येक पदार्थाला मिठाची सोबत दिल्यावर तो पदार्थ खातांना परिपूर्ण चव देतो ना..मग तशीच चव आपली आई आपल्या जीवनाला देत असते. खरतरं,आई शिवाय,आईच्या प्रेमाशिवाय सगळी सृष्टी अपूर्ण आहे,शुन्य आहे.
कदाचीत तुम्हाला माहीत आहे की नाही,मला माहीत नाही..,पण जसं शनिदेवाची आई संध्याचं प्रतिरूप छाया होती.कृष्णाची माता देवकी होती,पालनपोषण करणारी यशोदा देखील आईच होती.तशी आपली आई ही आपल्यालाच जीव लावणारी आपली आई असते.
तुम्हाला सांगू..,अगदी पैसे देऊन तुम्ही बाजारात कुठेही जरी गेलात ना..तरी तुम्हाला आईसारखं निस्सीम प्रेम,ममता आणि वात्सल्य हुडकूनही मिळणार नाही.खरतरं,आईची सेवाशुश्रूषा करणारा धन्यच असतो..पण या जमान्यात तरी सगळेच श्रावणबाळ होऊ शकत नाही.म्हणूनच म्हणतो,आईची अंगाई,आईची आपल्याविषयी असलेली काळजी हे आपल्यासाठी खुप मोठे लाखमोलाचे साम्राज्य असते.खरतरं,आईचे महत्व हे प्रत्येकाला लग्नानंतर कळते. ( मुलाला,बायकोच्या स्वरूपात आणि मुलीला सासूच्या स्वरूपात ) तिला नकळत आपण किती त्रास द्यायचो,कामाचा ताण द्यायचो.पण मित्रांनो,आई आपल्यासाठी जेवढं करते ना तेवढं आपण तिच्यासाठी किंवा तिच्याएवढं कधीच करू शकणार नाही. ती नेहमीच कामाला आपल्या  हातात घेऊन आपल्यावरच संस्कारांची बीजे रोवत असते.ती एक गृहिणी असून देखील आयुष्यातल्या कुठल्याही कामाला कधीच सुट्टी घेत नसते. ती कधीच थकत नसते. ती कधीच कुठल्याही कामाचा मोबदला मागत नसते. किंवा ती कधीच एखाद्या किनार्यावर,सूर्यास्ताची संध्याकाळ साजरी करत नसते.ती कधीच सेल्फीच फ्याडही मानत नसते.या उलट ती सणा-सुदीच्या काळात एकत्र जमून आपल्या नात्यात जर एकोपा निर्माण होत असेल तर कोणताही भेदभाव न करता समान भावनेने या सर्वात सामील होते आणि मग आपल्या कुटूंबाला आनंदाने पोट भरून जेवतांना बघून तीचे पोटं गच्च भरून जाते.
आता तुम्ही म्हणाल.,
हे सगळं जुन्या विचाराचं आहे.
जुन्या परंपरेचं आहे.
कलियुगात तर आता सगळं डिजीटल झालं आहे,सगळं फिंगरटिपवर मिळते आहे.पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा..यात आईचे प्रेम,आईची माया नाही.
शेवटी ‘आई ही आईचं’ असते.
ती आपल्यासाठी जीवनात खुप काही करते..तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो..!
खरचं..मला तर अजूनही विशेष वाटते.. आपुलकीची उब देणारी आणि दिवस रात्र आपल्यासाठी चूल पेटवणारी
“आई खुप काही करते”..!
(संकलन – आकाश दिपक महालपुरे. मो. 7588397772)
images
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा निर्यातबंदीनंतर शरद पवारांनी घेतली वाणिज्यमंत्र्याची भेट, फेरविचार करण्याची केली मागणी

Next Post

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – छगन भुजबळ

Next Post
IMG 20200802 WA0018

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या - छगन भुजबळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011