नाशिक : राज्य उत्पादन शुल्क नाशिकच्या विशेष भरारी पथकाने रविवारी (दि. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत ५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच वाहतूक करणा-या मनिष नानुभाई खेनी (रा. वराछा, गुजरात) यास ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने रविवारी पहाटे सापळा रचून ही कारवाई केली. पथकाने पांढ-या रंगाची कार क्र. (जीजे ०५ आरजे ६२७६) अडवून तपासणी केली असता कारच्या चोरकप्यात पंजाब निर्मित व केवळ दादरा व नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेश दारू आढळून आली. त्यात ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४४ बाटल्या, वॅट ६९ स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १३ बाटल्या व ब्लॅडर प्राईड व्हिाकीच्या ७५० मिलीच्या ४ बाटल्या व कार असा एकूण ५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चालक मनिष नानुभाई खेनी यास ताब्यात घेण्यात आले. निरिक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरिक्षक राजेश धनवटे, विजेंद्र चव्हाण, शाम पानसरे, दीपक आव्हाड, गौरव तारे, विष्णू सानप, महेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.