नवी दिल्ली – येथील शेतकरी आंदोलना दरम्यान संत बाबा रामसिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी अनेक बाबी लिहील्या आहेत.
त्यांनी लिहले की, शेतकर्यांचे दु: ख पाहिले जात नाही. तसेच केंद्र सरकार शेतकर्यांचे म्हणणे ऐकत नाही आणि ते सहन करू शकत नाही, अशी कंत त्यांनी व्यक्त केली आहे.
बाबा रामसिंह यांनी चिठ्ठीत लिहिले की, शेतकर्यांचे हाल पाहिले जात नाहीत. गेली अनेक दिवस रस्त्यावर थंडीत राहून शेतकरी हक्कांसाठी लढत असून हे पाहून हृदय हेलावले. त्यांना सरकार न्याय देत नाही. तर उलट अत्याचार करत आहे. त्यांचा छळ करणे हे पाप आहे. तसेच पुढे त्यांनी लिहिले की, शेतकऱ्यांच्या हक्क आणि सरकारची दडपशाही विरोधात कुणीतरी काहीतरी केले आहे, अनेकांनी सन्मान, पुरस्कार परत केले आहेत, संताप व्यक्त केला आहे, तर मी शासनाच्या दडपशाहीच्या विरोधात रागाच्या भरात आत्महत्या करीत आहे. हा माझा दडपशाहीविरूद्धचा आवाज आहे, तसेच शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज आहे. वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह.
दरम्यान, असे सांगितले जात आहे की, संत बाबा रामसिंग यांचा शीख समाजात मोठा आदर आहे. त्यांचे हजारो अनुयायी आहेत. तसेच बाबा रामसिंह हे बरेच दिवस शेतकरी चळवळीच्या सेवेत गुंतले होते. ते लोकांना ब्लँकेट आणि खाऊ वाटत होते. त्यामुळे या आत्महत्येची दखल घेऊन आंदोलक पुढे काय पवित्रा घेणार आणि सरकारची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.