नाशिक – शिक्षक दिनानिमित्त अॅम्परसँड समूहाने कोविड- १९ काळात शिक्षणाची निरंतरता वाढवण्यासाठी, बळकटीकरणासाठी व शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल थँक्यूू टीचर मोहीम राबवली. थँक यू टीचर मोहिमेची अंमलबजावणी मुंबई, नाशिक, पंजाबमधील राज्ये, नगर पालिका अंतर्गत असलेल्या अॅम्परच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत शासकीय व्यवस्थापित बालवाड्या, अंगणवाड्या, प्री स्कूल (ईसीसीई केंद्रे) आणि आदर्श शाळांमध्ये केली गेली.
हा उपक्रम महाराष्ट्रात नाशिकमध्ये महिला व बालविकास मंत्रालयाच्या (एमडब्ल्यूसीडी) अंतर्गत २५ अंगणवाड्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. एकूण देशातील २५ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. थँक यू टीचर कॅम्पेनमध्ये शिक्षकांना कृतज्ञता दर्शविण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ सामायिक करण्यात आले. याव्यतिरिक्त, ‘प्लांट अ ट्री’ उपक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकाच्या नावाने एक झाड लावले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी सेल्फ-शॉट व्हिडीओ, रेखाचित्रे, हस्तकला, गाणे, कविता याच्या मध्यमातून शिक्षकांचे आभार प्रकट केले.
महिला व बालविकास मंत्रालय, नाशिक येथील बालविकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर दौलत पगारे म्हणाले की, “आमच्या अंगणवाड्यातील शिक्षक आमच्या विद्यार्थ्याना आरोग्य सेवा देण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा होता. त्यांनी ही अडथळे असूनही ही मुले सतत शिकत राहिली आणि विकसित केली हे सुनिश्चित करण्यास मदत केली. कोविड-१९ ड्युटीवरही शिक्षक तैनात करण्यात आले असून ते नाशिक महानगर पालिकेच्या समन्वयाने कार्यरत आहेत. ते डोर-टू-डोर सर्वेक्षण करण्यासाठी कंटेन्ट झोनला भेट देत आहेत. अंगणवाडी शिक्षकांनीही प्रतिबंधात्मक उपाय, हात धुणे, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे इत्यादींविषयी जागरुकता निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अॅम्परसँड ग्रुप च्या सर्व मोहिमा शिक्षकांच्या आनुकरणीय प्रयत्नांसाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी बहुमूल्य आहे.”