मुंबई – प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपल लवकरच भारतात एक आयपॅड लॉन्च करणार आहे. हा नाईन्थ जनरेशन एन्ट्री लेव्हलचा आयपॅड असेल. अत्यंत लाईटवेट आणि स्लीम असेल. विशेष म्हणजे अत्यंत माफक दरात हा आयपॅड उपलब्ध असणार आहे. हा आयपॅड स्वेल्ट (Svelte) बॉडीमध्ये असेल आणि आयपॅड एअर३ प्रमाणे असेल. याच्या डिझाईनमध्ये कुठलाही बदल असणार नाही.
नव्या आयपॅडची किंमत २९९ डॉलर असेल. विशेष म्हणजे सध्या आयपॅड एअरची किंमत ३२९ डॉलर आहे. नव्या आयपॅडमध्ये ६४ जीबी स्टोरेज असेल. तर सध्या ३२ जीबी स्टोरेज आहे. यावर्षी मार्चच्या अखेरीसपर्यंत नवा आयपॅड लॉन्च होईल. अर्थात कंपनीच्या वतीने अद्याप तरी यासंदर्भात कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. नव्या आयपॅडचा डिस्प्ले १०.२ इंच असेल. मात्र आयपॅड एअरच्या तुलनेत अत्यंत स्लीम असेल. तर वजन अवघे ४६० ग्राम असेल. या डिव्हाईसमध्ये टच आयडी होम बटण दिलेले आहे जो लायटींग पोर्ट सपोर्टसोबत येईल.
अॅपलचा ८th जनरेशन आयपॅड
एप्पलचा ८th जनरेशन आयपॅड १०.९ इंच लिक्विड डिस्प्लेमध्ये असेल. याचे रिझोलुशन २३६०/१६४० पिक्सल असेल. हा पूर्णपणे लॅमिनेटेड असेल आणि रिफ्लेक्टिंग कोटींगसोबत उपलब्ध होणार आहे.