अहमदाबाद – काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना फैसल म्हणाले की, जर काँग्रेस हाय कमांड सांगितले तर मी निवडणूक लढविण्यास तयार आहेत.
गुजरातमध्ये अहमदाबादसह सहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अहमदाबाद नजिकच्या खाडिया येथे पोहोचले. यावेळी फैसल पटेल यांनी सांगितले की, हाय कमांडने त्यांना निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर ते निवडणुका लढण्यासही तयार आहेत.
दरम्यान, आगामी २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावतील असा विश्वास आहे. खासदार अहमद पटेल यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी राजकारणात येण्यास स्पष्टपणे नकार दिला. तेव्हा अहमद पटेल यांचा मुलगा फैसल आणि मुलगी मुमताज म्हणाले होते की, आम्ही दोघे वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्य करत निःस्वार्थपणे जनतेची सेवा करु.