अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे पाण्यावरील विमानतळ आणि केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला अहमदाबादमधील साबरमती नदी किनाऱ्याशी जोडणाऱ्या सागरी विमान सेवेचे उद्घाटन केले. अहमदाबाद येथील साबरमती नदी किनाऱ्यावर पाण्यावरील विमानतळाचे उद्घाटन केले आणि साबरमदी नदी किनाऱ्यापासून केवडिया पर्यंत असलेल्या सागरी विमान सेवेचे देखील उद्घाटन केले. शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण पोहोचविण्यासाठी पाण्यावरील नियोजित विमानतळ मालिकेचा हा एक भाग आहे. विमानाला उतरण्यासाठी आखलेले पट्टे किंवा धावपट्टी उपलब्ध नसताना देखील पाण्यावरून विमानाचे उड्डाण करण्याची आणि पाण्यावर उतरण्याची क्षमता या सागरी विमानामध्ये आहे. अशा प्रकारे भौगोलिक क्षेत्र / असे क्षेत्र की ज्यास त्याच्या भौगोलिक कारणास्तव काही आव्हाने आहेत, ते जोडण्यास मदत केली जाऊ शकते आणि विमानतळ आणि धावपट्टी बांधण्यासाठी अधिक खर्च न करता भारतातील दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेता येईल. असे लहान आकाराचे पंख असलेली विमाने पाणी असलेल्या पृष्ठभागावर जसे की तलाव, बॅकवॉटर आणि धरणे, वाळूचे रस्ते आणि गवत अशा प्रकारच्या असंख्य पर्यटन स्थळांवर देखील सहज उतरु शकतात.
बघा व्हिडिओ