नवी दिल्ली – अलीकडे कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल, रस्ता माहीत नसेल तर हमखास गुगल मॅपची मदत घेतली जाते. एवढंच कशाला, एखाद्या रस्त्यावरचा ट्रॅफिक किती आहे हे पाहण्यासाठीसुद्धा आपण त्याचीच मदत घेतो. पण खरंच, सगळीकडचा ट्रॅफिक गुगलला कसा कळत असेल बरं, हा विचार केला आहेत का कधी? ही माहिती घेण्यासाठी गुगलने काही यंत्रे लावली असतील का? तर ते काही शक्य नाही. मग कशी बरं ही अपडेट माहिती त्यांना मिळत असेल?
गुगलला ही माहिती तुमचा मोबाइलच देतो. आश्चर्य वाटलं ना. अँड्रॉईड आणि iOS युझर्सचे लोकेशन गुगल ट्रेस करत असते. यातूनच ट्रॅफिकची माहिती गुगलला मिळते. या दरम्यान रस्त्यावर ज्या ठिकाणी सर्वाधिक मोबाइल लोकेशन्स मिळतात, त्या ठिकाणी गुगल ट्रॅफिक जाम असल्याचे आपल्याला सांगतो, आणि नकाशावर तिथे लाल रंगाने मार्किंग केले जाते. आणि आपल्याला याची माहिती मिळते.
मोबाइलसोबतच गुगलचे अन्यही काही सोर्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते ट्रॅफिकची माहिती मिळवतात. यात गुगल मॅप कम्युनिटीचा देखील समावेश आहे. याशिवाय गुगल आणखी काही नवीन टूल्स यात आणणार आहे, ज्यामुळे युझर्सना गुगल मॅप वापरणे अधिक फायदेशीर ठरेल.