वॉशिंग्टन – कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुप्त अॅक्शन प्लॅन तयार केला होता. लादेनच्या शोधाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच दर तीन दिवसांनी या शोध मोहिमेच्या प्रगती अहवाल त्यांच्या डेस्कवर आणला जावा, असा आदेश ओबामा यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिला होता.
लादेनच्या अॅक्शन प्लॅनबाबत ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्या काळात सिच्युएशन रूमची बैठक संपताच ओबामा यांनी आपल्या काही सल्लागारांना व्हाईट हाऊसच्या मुख्य कार्यालयात नेले आणि आतून दार बंद केले. त्या बैठकीमध्ये व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रहम इमानुएल, सीआयएचे संचालक लिओन पेंटा आणि उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टॉम डॅनिलॉन यांचा समावेश होता. याबाबत ओबामा यांनी त्यांच्या ‘ए प्रॉमिसड लँड’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ११/११ ला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त एक दिवस आधी सीआयएचे संचालक लिओन पेंटा आणि माईक मॉरेल यांनी मला भेटायला वेळ मागितला. लिओन म्हणाले की, आम्हाला नुकताच बिन लादेनविषयी फार महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी १४ डिसेंबर २००९ रोजी, लियोन आणि माइकची जोडी पुन्हा ओबामा यांना भेटण्यासाठी आली. यावेळी त्यांच्यासोबत सीआयए अधिकारी आणि विश्लेषक होते. हे अधिकारी सीआयएच्या काउंटर टेररिझम सेंटर आणि अमेरिकेच्या लादेन अभियानाचे प्रमुख होते. या दोन जणांनी ओबामांना एबटाबादच्या त्या कंपाऊंडमध्ये पोचवलेल्या सर्व बाबींची माहिती दिली.
ओबामा पुढे लिहितात की, अॅडमिरल मॅक्रॅव्हन यांनी आग्रह धरला की, आपली योजना पाकिस्तानी सैन्याला कळली तर ते आम्हाला वेढतील तसेच त्या जागेचा ताबा सोडणार नाही. या कारणास्तव त्यांनी गुप्त योजना तयार केल्या. तसेच तेथून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी ते मुत्सद्दीपणे पाकिस्तानी सरकारशी बोलू लागतील. दरम्यान, होस कार्टराइट यांनी आणखी एक पर्याय सुचविला की, जेव्हा ‘द पेसर’ दररोज चालत असेल तेव्हा ड्रोनने यार्डवर 13 पौंड क्षेपणास्त्र का सोडू नये. ओबामा यांनी कोणत्याही पर्यायांबद्दल अंतिम हमी भरली नाही, परंतु त्यांनी निश्चितपणे सांगितले की, गुप्त योजना तयार करण्यासाठी, मी त्यांच्या बाजूने आहे इतकेच सांगितले.