शनि अमावस्या माहात्म्य
नवग्रहांतील शनि हा अतिशय प्रभावी ग्रह मानला जातो. शनीची वक्रदृष्टी ही न परवडणारी असते, अशी भक्तांची मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येकजण शनि उपासना अतिशय मनोभावे करीत असतो. आजपासून सुरू होणाऱ्या शनि अमावस्येचे महत्त्व जाणून घेणार आहोत…

इ मेल – [email protected]
यंदाच्या वर्षात केवळ दोन शनि अमावस्या आहेत. त्यातील पहिली शनि अमावस्या ही १२ मार्चला दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी सुरू होत आहे. ही अमावस्या १३ मार्चला दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी संपते आहे. तर दुसरी अमावस्या ३ डिसेंबर रोजी आहे.
शनि अमावस्येला शनि पूजनाचे विशेष महत्व आहे. अमावास्या ही पितरांची तिथी देखील असते. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळवण्याच्या दृष्टीने विविध धार्मिक विधी केले जातात. शनीची साडेसाती असणारे त्याचप्रमाणे कुंडलीतील शनी नकारात्मक भावात असता शनी शत्रू ग्रह बरोबर असता शनी उपासना सुचवली जाते.
शनी हा शारीरिक व मानसिक स्वस्थता, दीर्घ आरोग्य यांचा कारक आहे. शनि अमावस्येला शनि मंदिरात मोहरीचे तेल, लोखंडी दिवा, काळे तीळ, काळे उडीद अर्पण करण्याचा प्रघात आहे. बरेच शनि भक्त या दिवशी काळे वस्त्र परिधान करतात.










