महाशिवरात्रि माहात्म्य
तसे तर शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येत असते. परंतु फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी दिवशी येणारी शिवरात्र ही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने याला महाशिवरात्र म्हणतात….
महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या शिवपिंड पुजनाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महाशिवरात्रीबाबत अनेक प्रकारच्या पौराणिक कथा सांगितल्या जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला, असे मानले जाते.
समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले काल कोट नामक विष स्वतः भगवान शंकरांनी प्राशन केले व या त्यास आपल्या कंठात स्थिर केले. म्हणून आजच्या दिवशी त्यांना नीलकंठ नाव प्राप्त झाले. महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकर शिवपिंडीच्या रूपात प्रकट झाले.
महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकरांनी रुद्रावतार धारण करून तांडव नृत्य केले, अशा विविध मान्यता आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर पंचामृताचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण करणे, यास विशेष महत्त्व आहे.
ज्योतिर्लिंग दर्शन शिवतांडव स्तोत्राचे गायन करणे, शिव आरती करणे, मस्तकी त्रिपुंड लावणें शंखध्वनी यास देखील महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिव आराधना व उपवास यास विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला निरंकार उपवास करण्याचा प्रघात आहे. त्याचे निश्चित फळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे.