मुंबई – आपल्या घरापेक्षा शेजारच्या घरात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची मानवी वृत्ती आहे. त्यातही अरबोपती-खरबोपतींच्या घरातील गोष्टी जाणून घेण्यात तर जास्तच इंटरेस्ट असतो. त्यातल्या त्यात अंबानी कुटुंब तर आघाडीवर आहे. देशातील प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला अंबानींच्या घरात काय चाललय हे एकण्याची उत्सुकता असते. यात आता मुकेश अंबानींची कन्या ईशा हिच्या बंगल्याची चांगलीच चर्चा आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न आनंद पिरामल याच्यासोबत झाले आहे. दोन वर्षांपूर्वी दोघेही विवाहबंधनात अडकले. या लग्नावर मुकेश अंबानीने तब्बल ७२० कोटी रुपये खर्च केले होते. एवढे तर एखाद्या महापालिकेचे वार्षिक बजेट असते. असो. पण ईशाचे सासू-सासरेही कमी नाहीत. त्यांनी आपल्या मुलाला व सुनेला एक घर गिफ्ट केले आणि तेच घर सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. या आलिशान बंगल्याचे नाव ‘गुलिटा’ असे आहे. या बंगल्याची छायाचित्रे जो बघतो त्याच्या भुवया उंचावल्याच समजा. हा बंगला जवळपास ५० हजार चौरस फूट जागेत पसरला आहे. बाहेरून डायमंडच्या आकाराचा दिसतो आणि आतून एखाद्या महालापेक्षा कमी नाही. मुंबईच्या वरळी परिसरात असलेल्या या पाच मजली बंगल्यावरून समुद्राचा नजारा बघायला मिळतो. ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामलने २०१२ मध्ये हिंदुस्थान युनीलिव्हरकडून हा बंगला खरेदी केला होता, असे समजते. विशेष म्हणजे अनिल अंबानी आणि गौतम अडाणी यांचीदेखील या बंगल्यावर नजर होती. मात्र त्यावेळी अजय पिरामल यांनी सर्वाधिक बोली लावून हा बंगला आपल्या नावावर करून घेतला होता.
या बंगल्याला तीन बेसमेंट आहेत. त्यातील दोन सर्व्हिस आणि पार्किंगसाठी आहेत. पहिल्या बलेसमेंटमध्ये लॉन, वॉटर पूल आणि एक मोठी रूम आहे. तर ग्राऊंड फ्लोअरला देखणी एन्ट्रन्स लॉबी आहे. वरच्या मजल्यांवर लिव्हींग रूम, डायनिंग हॉल आणि बेडरूम आहे. ईशा अंबानीच्या घरी काम करणाऱ्या लोकांनादेखील खूप साऱ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी बंगल्यातच सर्व्हंट क्वार्टर तयार करण्यात आले आहेत. एवढे वर्णन एकल्यावर बंगल्याच्या किमतीबाबत उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार या बंगल्याची किंमत जवळपास ४५० कोटी रुपये सांगितली जात आहे. म्हणजेच मुकेश अंबानीने जेवढा खर्च लेकीच्या लग्नावर केला त्याच्या अर्ध्या किमतीचा तिचा बंगला आहे.
बघा व्हिडिओ