मुंबई – भारत बायोटेक कंपनीविषयी जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. मुळात एका शेतकऱ्याच्या मुलाने १२ कोटी रुपयांमध्ये ही कंपनी सुरू केली होती. हैदराबाद येथील या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला (५१) यांना शेती करण्याची इच्छा होती. मात्र आज ते व्हॅस्कीन बनवत आहेत.
कृष्णा एला हे तामिळनाडू येथील थिरुथानी गावातील आहेत. शेतीचे शिक्षण घेतल्यानंतर आर्थित परिस्थिती ध्यानात घेऊन बेअर केमिकल्स अँड फार्मास्यूटीकल्स कंपनीच्या कृषी विभागात काम करायला सुरुवात केली. याच कालावधीत त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये अमेरिकेतील हवाई विश्वविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युनिव्हर्सिटी आफ व्हीस्कॉनसीन-मेडीसीनमध्ये पीएचडी केल्यानंतर १९९५मध्ये ते भारतात परतले.
१९९६ मध्ये सुरू केली कंपनी
आईच्या म्हणण्यावर पत्नी सुचित्रासोबत भारतात परतलेले कृष्णा यांनी १२.५ कोटी रुपयांची गुंतवणुक करून हैदराबाद येथे १९९६मध्ये भारत बायोटेकची स्थापना केली. तीन वर्षांच्या आत त्यांच्या कंपनीने हिपीटायटीस-बीची लस तयार केली आणि तिला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांनी १९९६ मध्ये लॉन्चही केले. देशाला हिपीटायटीस-बी लसीकरण अभियानासाठी दहा रुपये प्रती डोझच्या हिशेबाने लसही उपलब्ध करून दिली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात हिपीटायटीस-बीच्या एका डोझची किंमत १४०० रुपये होती.
जगातील १५० देशांना युनिसेफ आणि गावीच्या अंतर्गत विविध लशींचे ३०० डोझ उपलब्ध करून देत आहेत. यांच्या कपनीजवळ एकूण १६० पेटंट आहेत आणि कंपनीजवळ स्वतःकडेदेखील १६ प्रकारच्या लशी आहेत. सायरस पुनावाला पुणे येथील सीरम इन्स्टीट्यूट आफ इंडियाचे चेअरमन आहेत. ही देशातील सर्वक्षेष्ठ बायोटेक कंपनी आहेच, शिवाय जगातील सर्वांत मोठी व्हॅक्सीन उत्पादक कंपनीही आहे. गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, सर्वांना निरोगी ठेवण्यासाठी स्वस्त लस, असे त्यांचे ध्येय आहे. डॉ. सायरस यांनमी पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज आफ कॉमर्स येथून शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून आचार्य पदवी घेतली.
घोडे पाळण्यातून सूचली कल्पना
सायरस पुनावाला यांचे वडील घोडा पालन करायचे. २० वर्षाच्या वयातच सायरस यांच्या लक्षात आले की यात भविष्य नाही. सायरस यांनी सर्व घोडे हॉफकीन इन्स्टीट्यूटला विकले. कारण हे इन्स्टीट्यूट घोड्यांच्या सीरमवरून लस तयार करायचे. इथूनच त्यांना सीरम निर्मिती क्षेत्रात काम करण्याची कल्पना सूचली आणि वडिलांचे मन वळवून १९६६ मध्ये संस्था सुरू केली.