– मध्यरात्रीच्या आणीबाणीच्या प्रक्रियेमुळे गंभीर रक्तस्त्राव झालेल्या यकृत सिरोसिसच्या रुग्णाला जीवदान….
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक येथे नुकतीच उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच TIPS (Transjugular Intrahepatic Portosystemic Shunt) शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. टीआयपीएस शस्त्रक्रिया सर्जिकल बायपाससारखे कार्य करते परंतू बायपासपेक्षा कमी जोखमीची आणि लवकर प्रतिसादात्मक आहे. लिव्हर सिरोसिस होऊन वाहिन्यांवर होणाऱ्या उच्चरक्तदाबामूळे होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यासाठी टीआयपीएसचा वापर केला जातो. तसेच यकृता मध्ये सामान्यत: पोट, अन्ननलिका किंवा आतडे यातील रक्तवाहिन्यांतून होणारा रक्तस्त्रावही यामुळे आटोक्यात आणता येतो. टीआयपीएस ही एक अत्यंत नाजूक प्रक्रिया आहे जी तज्ञ डॉक्टर रुग्णास लिव्हर सिरोसिस होऊन रक्ताची उलटी होणे, एन्डोस्कोपी करूनही रक्ताची उलटी न थांबणे आणि सतत पोटात पाणी होणे यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरतात.
डॉ तुषार संकलेचा (MD DM Gastroenterology, Head of Gastroenterology Department, Ashoka Medicover Hospitals, Nashik) यांनी टीआयपीएस करण्यात आलेल्या रुग्णाला क्रोनिक लिव्हर डिसीज (लिव्हर सिरोसिस) आहे. रुग्णास रक्ताच्या उलट्या होत होत्या, एन्डोस्कोपी करूनही रक्त वाहिन्यांवरील दबाव कमी होत नव्हता. परंतु टिप्स शास्त्रक्रिये नंतर अंतर्गत रक्तप्रवाह बंद होऊन रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. अतिशय क्लीष्ट शस्त्रक्रिया डॉ अमोल भालेकर (Interventional Radiologist) आणि डॉ तुषार संकलेचा (Head of Gastroenterology Department) यांच्याकडून अनुभव कौशल्याने करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील कॅथलॅब टेकनिशियन टीम, आय सी यू टीम, अनास्थेशिया टीम आणि तज्ञ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
लिव्हरच्या (लिव्हर सिरॉसिस) जुनाट आजार असलेल्या रुग्णांवर टिप्स शस्त्रक्रियेचा सकारात्मक परिणाम बघायला मिळतो. रक्तवाहिन्यांवर येणारा दबाव (Pressure) कमी करण्यासाठी बायपास मार्गाने ही प्रक्रिया करण्यात येते. मुखतः लिव्हर सोरायसिसच्या रुग्णास रक्तस्रावाचा धोका जास्त असतो. रक्तवाहिनिला यकृतात काही इजा होणे, नसांवर दबाव येणे, यकृताला हानी पोहोचणे किंवा लिव्हर सिरॉसिस मूळे पोटात पाणी होणे अश्या अनेक त्रासांवर टीआयपीएस चा उपयोग होतो. बायपास करून नसा यकृताकडून हृदयापर्यंत पोहोचवल्या जातात. परंतु दुर्लक्ष केल्याने बरयाचदा अन्न नलिकेच्या नसा फुटून रक्तस्त्राव होतो आणि परिणामी रुग्णास रक्ताच्या उलट्या होतात. बऱ्याचदा याचा परिणाम घातक असतो.
रक्ताभिसरणात यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते. रक्तवाहिन्यांव्यतिरिक्त, यकृतामध्ये दोन प्रकारच्या नसा वेगवेगळ्या कार्ये करत असतात. पोर्टल शिरा पचन तंत्राच्या अवयवांमधून यकृता पर्यंत पोषक-समृद्ध रक्ताचे वहन करतात, तर यकृतातील रक्तवाहिन्या यकृतातून डीऑक्सिजेनेटेड रक्त हृदयापर्यंत पोचवते.
यकृता मध्ये असणाऱ्या इतर पचन संस्था अवयवांकडून रक्त प्रवाह पुन्हा पोर्टल रक्तवाहिन्यातून जाण्यासाठी तसेच रक्तदाब कमी करण्यासाठी टीप्सची प्रक्रिया वापरली जाते. टीआयपीएस प्रक्रियेत दोन प्रकारच्या नसा दरम्यान एक चॅनेल तयार केले जाते. अधिक परिणामकारक किंवा घातक यकृत रोग असणाऱ्या रुग्णांना या शस्त्रक्रियेची गरज असते. कारण अशुद्ध रक्तस्त्रावामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांवर सतत दबाव येत असतो. मधुमेह, जास्त वजन तसेच लिव्हर संबंधित आजार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाने आपल्या आजाराचे निदान करून घेणे आवश्यक आहे.
…..
टीआयपीएस गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
“डॉ. तुषार संकलेचा (हेड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि डिपार्टमेंट) यांनी केलेले ही टिप्स शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची आणि कौशल्यपूर्ण आहे. टीआयपीएस गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये आधुनिक सुविधा, उपकरणे आणि तज्ञ तसेच अनुभवी डॉक्टर्स उपलब्ध आहेत. अचूक आणि वेळेत रुग्णसेवेसाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि कर्मचारी कायम तत्पर आहेत. रुग्णाला शास्त्रक्रिये दरम्यान व शास्त्रक्रिये नंतर लागणाऱ्या प्रक्रियेची आवश्यक उत्तम सोय रुग्णालय देण्यास सक्षम आहे. त्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची निवड अधिक चांगला परिणाम देणारी आहे. रुग्णसेवेचा अनुभव आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे त्यांचे रुग्णसेवेचे कार्य अविरत होत आहे.”
डॉ सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर, अशोका हॅास्पिटल
……
यामुळे रुग्णाचे निदान आणि उपचार लवकर होतात
अनुभवी तज्ञ आणि रुग्णालय सुविधा यांची योग्य सांगड असल्याने अश्या शस्त्रक्रिया करणे रुग्ण आणि डॉक्टर्स याना सोईचे असते. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये हृदयरोग, मेंदूविकार आणि मज्जा रज्जू विभाग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग – प्रसूतीशास्त्र, नवजात अर्भक तसेच बालरुग्ण विभाग, मूत्र संस्थे संबंधित विकार, सांधेदुखी आणि सांधे प्रत्यारोपण, पोटाचे विकार, सामान्य शस्त्रक्रिया, आपत्कालीन विभाग अश्या सर्वच विभागांचे स्वतंत्र कक्ष, तज्ञ आणि अनुभवी कर्मचारी आहेत. यामुळे रुग्णाचे निदान आणि उपचार लवकर होतात.
रितेश कुमार, सेंटर हेड, अशोका हॅास्पिटल