नाशिक – अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे बहुराष्ट्रीय हॉस्पिटल नेटवर्कचा भाग आहे, जेव्हा नाशिक मधील distributor’s कडून रेमडेसिवीर स्टॉक उपलब्ध होत नव्हता तेव्हा, मेडीकव्हर हॉस्पिटलचे भारतातील इतर १६ हॉस्पिटल मधून १००० चा स्टॉक हा नाशिक, औरंगाबाद आणि संगमनेर शाखे साठी आला होता असा खुलासा अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलच्या प्रशासनाने केला आहे.
या खुलासामध्ये म्हटले आहे की, मेडीकव्हर हॉस्पिटलने रीतसर कंपनी कडून आलेला स्टॉक हा उपलब्ध झाल्यामुळे, काल एफडीए यांच्या विनंती नुसार १०० चा स्टॉक हा मालेगावला पाठवण्यात आला. माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबानीही राज्याच्या एफडीएशी संपर्क करून याची खात्री केली आहे. शासनाच्या आदेशानुसार रेमडेसिवीर औषधांची जबाबदारी ही हॉस्पिटलची असल्या कारणाने हॉस्पिटलने हा स्टॉक मागवला गेला.आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलने सदरचा स्टॉक महाराष्ट्रातील मेडीकव्हरच्या तीन हॉस्पिटल साठी होता.
सद्यस्थितीत अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये १५० पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत व त्यासाठी रोज साधरण १८० ते १९० इंजेक्शनची गरज असते. सदरचा स्टॉक हा फक्त २/३ दिवस पुरेल इतकाच आहे. हॉस्पिटल प्रशासन हे प्रामुख्याने नमूद करते की, जी बातमी बाहेर प्रसिद्ध केली जात आहे ती माननीय तहसीलदार साहेब व एफडीएच्या अधिकारी यांच्या तपासा आधीच कुठलीही सत्यता न पडतळता दिली गेली, हॉस्पिटल प्रशासनाने तपास अधिकाऱ्यांना तपासासाठी लागणारी सर्व कागदपत्र सादर केले आहे. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे रुग्ण सेवे साठी सदैव तत्पर आहे. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल वर होत असणाऱ्या खोट्या आरोप बद्दल हा खुलासा आहे असे हॅास्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.