नाशिक – एनएबीएच (NABH) मानांकन प्राप्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलला नुकतेच उत्कृष्ट रूग्णसेवेसाठी इंटिग्रेटेड हेल्थकेअर अॅन्ड वेलबिंग काउन्सिल कडून देशव्यापी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आणि खूप कमी कालावधीत नावारूपाला आलेले रुग्णालय असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी तत्पर, विस्तीर्ण आणि सर्व सोईसुविधा असलेली रुग्णालयाची वास्तू म्हणजे अशोका मेडिकव्हर. दोन वर्ष इतक्या कमी काळात रुग्णालयात ७० हजार पेक्षा अधिक रुग्णांनी वेगवेगळ्या विभागात वैद्यकीय उपचार घेतले आहेत. कमी वेळेत उत्तमरीत्या रुग्णसेवा देऊन निरोगी आरोग्य देणारे रुग्णालय म्हणून अशोका मेडिकव्हर ने आपली ओळख निर्माण केली आहे. अत्याधुनिक यंत्रणा, स्वच्छता आणि वेळोवेळी निर्जंतुकीकरण हे अशोका मेडिकव्हर चे प्रमुख वैशिष्ट्य. युरोपिअन रुग्णालयाचे प्रोटोकॉल असलेले रुग्णालय अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमुळे नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रालाही खूप मदत झाली.
हृदयरोग, किडनी विकार, बालरुग्ण तसेच नवजात अभ्रकां मधील आजार, मधुमेह, स्त्रीरोग व प्रसूती संबंधित आजार, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, दंतविकार, नेत्र विकार विभाग अशा सर्व वैद्यकीय सेवांमधे पारंगत तज्ज्ञ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये रुग्यसेवा देत आहेत. लहानमुलांसाठी आधुनिक यंत्रणायुक्त सर्वांत मोठा विभाग असलेले एकमेव रुग्णालय, स्त्री रोग आणि प्रसूती शास्त्राला महत्त्वाचे स्थान देणारं रुग्णालय अशी ओळख आज अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने गेल्या वर्षभरात निर्माण झाल्याचेही हॅास्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रशस्त रुग्णालय
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रशस्त रुग्णालय, अँब्युलन्स ची व्यवस्था, महानगरपालिकेसाठी मोफत अँब्युलन्सची व्यवस्था २४ तास अतिदक्ष सेवा आणि औषधे यांचे बॅकअप, सिटी स्कॅन आणि एमआरआई साठी सर्वोत्कृष्ट मशीन, बाह्य रुग्ण आणि अंतर्गत रुग्ण यांना वेगवेगळ्या औषधालयाची व्यवस्था अशा नानाविध सुविधा एकाच छताखाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल उपलब्ध आहे. अशोका मेडिकव्हरच्या सेवाभावी कामकाज प्रणालीमुळे विविध सामाजिक, प्रसार माध्यमांसह विविध राजकीय- सामाजिक संस्थांनी दखल घेत पुरस्कार देऊन सन्मान केल्याचे हॅास्पिटल प्रशासनाने सांगितले.
हॉस्पिटलचे सर्वत्र कौतुक – सचिन बोरसे
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे क्लस्टर हेड सचिन बोरसे म्हणाले की,कोविड काळातही अगदी २ वर्षाच्या बाळापासून ते १०२ वर्षीय वयोवृद्ध आजींपर्यंत अनेक रुग्ण पूर्ण आणि यशस्वी उपचार देऊन बरे करण्यात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स नाशिक यांचे महत्वाचे कार्य आहे. अत्यावस्थेत असणाऱ्या रुग्णाला देखील दाखल करून घेण्यास कधीही नकार न देता उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेवाभाव आणि रुग्ण यांची सांगड घालून करण्यात येणाऱ्या कार्यास मिळालेल्या या पुरस्काराने हॉस्पिटल प्रशासन, कर्मचारी आणि डॉक्टर्स हे देखील समाधान व्यक्त करीत आहेत.
सामाजिक बांधिलकीचे भान
सामाजिक बांधिलकीचे भान राखत रुग्णालय मोफत आरोग्य तपासणी शिबिरे तसेच तपासण्या राबवत असते. त्यासाठी अनेक कर्मचारी आणि डॉक्टर्स मेहनत घेत असतात. कायमच रुग्णालयात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी पॅकेज गरजू रुग्णांच्या उपयोगात यावे म्हणून असतात. सर्व प्रकारचे आरोग्य विमा रुग्णालय स्वीकारत असून रुग्णसेवा अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी त्याचा उपयोग होतो असेही हॅास्पिटलतर्फे सांगण्यात आले.