नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घातक मांजा न वापरण्याची शपथ घेतली आहे. तसेच, पतंगोत्सवातील दुखापतींवर मोफत प्राथमिक उपचार करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला आहे.
”या संक्रांतीला मी पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक मकर संक्रांत साजरी करेन. ज्यात मी सोशल डिस्टंसिंगचे पालन करेन. पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा उपयोग करणार नाही. हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवेल”, अशी शपथ हॉस्पिटल्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली. नायलॉन मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडतात. म्हणून अशा घटनांचे सामाजिक भान राखून हॉस्पिटल्सने पंतग उडवताना होणाऱ्या अपघातांवरील प्राथमिक उपचार जसे ड्रेसिंग, मांजा हाताळताना होणारी किरकोळ जखम आणि डॉक्टरांचा मोफत सल्ला असा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे.