नाशिक – मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका मार्ग येथील अत्याधुनिक पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस चौकीमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक परिसरातील चौकांचे अत्याधुनिक नूतनीकरण करण्यात येत आहे असे मत यावेळी यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले. पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण अत्याधुनिक पद्धतीने कमी करण्याकडे पोलीस प्रशासन वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना त्यांच्या समस्या कमीत कमी वेळात सोडवण्यासाठी व समस्येवरील निवारणासाठी शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्व चौकींचे नूतनीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशोका मार्ग येथे अत्याधुनिक चौकीमध्ये वायफाय असून सिग्नल वर ४ सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. यावेळी पोलीस चौकी बनवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा पोलीस आयुक्ताच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी उद्योजक अशोक कटारिया पोलीस, उपायुक्त पौर्णिमा चौगुले , पोलीस उपायुक्त अमोल तांबे , उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक मनोज कारंजे ,वाहतूक पोलीस निरीक्षक सदानंद ईनामदार, अशोका पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अंकुश जाधव , माजी नगरसेवक यशवंत निकुळे, सुनील खोडे, ठेकेदार शशी हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.