मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह शब्द नमूद असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही बाब अशुद्ध मराठी लेखनातून झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याद्वारे खडसे यांची बदनामी होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी एका महिलेने गृहमंत्री अनिल देशमुखांसह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि अन्य नेत्यांना ट्वीट केले. तसेच, या सर्वांचे याकडे लक्ष वेधले. त्याची तत्काळ दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी भाजपला याची दखल घेण्याची विनंती केली आहे. तसेच, याप्रकरणी आता महाराष्ट्र सायबर सेलही चौकशी करणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी पक्षश्रेष्टींकडे तक्रार केल्याचे खडसे यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1354469742287810563