मुंबई – क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील नातेसंबंधांना मोठा इतिहास आहे. सुप्रसिद्ध क्रिकेटर्सचे मन बॉलीवूडच्या सुंदर तारांकांवर येऊन त्यांनी लग्न केल्याची उदाहरणे अनेक आहेत. अशीच एक सुपरहिट जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. लोक यांना एकत्रितपणे ‘विरुष्का’ नावाने ओळखतात. अनुष्का शर्मा सध्या गर्भवती असल्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालेली आहे.
पहिल्या भेटीत होता नर्व्हस
विराट कोहली मैदानावार अगदी आत्मविश्वासाने ओतप्रोत भासत असला तरीही अनुष्काबरोबर च्या पहिल्या भेटीत मात्र विराट बराच नर्व्हस झाला होता. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटींगच्या दरम्यान झाली. दोघेही एका शॅम्पूच्या जाहिरातीचे शुटींग करत होते. याआधी विराटने कधीच कोणत्याही अभिनेत्रीबरोबर काम केले नव्हते. सेटवर अनुष्का समोर आल्यानंतर तो चांगलाच घाबरून गेला होता.
या निमित्ताने भेट
एका इंटरव्ह्यूदरम्यान विराटने सांगितले होते की, “मी अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो. ही शुटींग तीन दिवस पर्यंत चालली होती. माझ्या मॅनेजरने जेव्हा मला सांगितले की ही जाहिरात तुम्हाला अनुष्का शर्मा बरोबर शूट करायची आहे तेव्हा मी चांगलाच घाबरलो होतो. मी त्याला म्हणालो की अनुष्का एक व्यावसायिक अभिनेत्री आहे आणि तिच्या बरोबर अभिंय करणे मला शक्य होणार नाही. तेव्हा मॅनेजरने मला समजावले की सगळंकाही ठीक होईल आणि स्क्रिप्ट छान मजेदार आहे. तरीसुद्धा मी बऱ्यापैकी नर्व्हस झेलेलो होतो.”
अनुष्काला विचित्र वाटले
विराटने सांगितले की शुटींगच्या दरम्यान अनुष्काने हाय हिल घातली होती आणि त्यामुळे ती आहे त्यापेक्षा जास्त उंच दिसत होती. यावरून विराटने एक जोक सांगितला आणि त्यानंतर हसण्याऐवजी अनुष्काला विचित्र वाटले. हे पाहून विराट अजूनच घाबरला. या जाहिरातीच्या शुटींग दरम्यानच विराट आणि अनुष्का यांची मैत्री झाली आणि भेटीगाठी सुरु झाल्या. पुढे काही दिवस एकमेकांच्या सोबत डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले. लवकरच ते आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.