नवी दिल्ली – राजधानी दिल्ली मध्ये विना चालक मेट्रो ट्रेन चे उद्घाटन झाले आहे. मानवी हस्तक्षेप शून्य असणाऱ्या या चालकरहित गाड्यांमुळे लक्षावधी लोकांना लाभ होईल असे सांगण्यात येत आहे. सध्या चालक विरहीत मेट्रो ट्रेनचे संचालन जगातील काही मोजके देशच करतात. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे एक क्रांतिकारी पाउल आहे.
जगात होईल नाव
आता दिल्ली मेट्रोच्या एकूण मार्गांपैकी ९४ टक्के मार्गांवर चालक रहित ट्रेन धावेल. हे अंतर जगात एकूण जितक्या मार्गावर या ट्रेन्स चालतात त्यांपैकी ९% इतके असेल. जगात आजवर जितके मेट्रो मार्ग आहेत, त्यापैकी केवळ सात टक्के मार्गावर चालक रहित गाड्या चालतात.
रूपे डेबिट कार्डचा वापर
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या मदतीने एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनवर एका कार्डने सर्व प्रकारच्या प्रवासाचे पैसे भरता येणे शक्य आहे. रूपे डेबिट कार्ड आता एनसीएमसी च्या रुपात उपयोगात आणता येईल. देशभरात एकूण २३ बँक्स एनसीएमसी च्या नियमांचे पालन करतात. त्यामुळे रूपे डेबिट कार्ड धारकाला दिल्ली मेट्रो च्या एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनवर सध्या या कार्डचा वापर करून पैसे भरता येणार आहेत. वर्ष २०२२ पर्यंत दिल्ली मेट्रो च्या सर्वच नेटवर्क वर याच पद्धतीने कार्ड पेमेंट सुरु केले जाईल. सध्या दिल्ली मेट्रोचे जवळपास ३९० किमी इतके नेटवर्क आहे यात ११ कॉरीडोर्स आणि २८५ स्टेशन्स आहेत.
देशभरात मेट्रोचा विस्तार
गेल्या सहा वर्षात देह्सात मेट्रो नेटवर्कचा जबरदस्त विस्तार झाला आहे. २०१४ मध्ये पाच शहरांत २४८ किमी इतके मेट्रो नेटवर्क होते. सध्या १८ शहरांत ७०२ किमी इतके मेट्रो चे जाळे पसरले आहे. २०२२ पर्यंत २७ शहरांत १००० किमी पेक्षा अधिक मेट्रो जाळे असणार आहे आणि दररोज कोट्यावधी यात्री याने प्रवास करताना दिसतील.
बघा मेट्रोचा हा व्हिडिओ (सौजन्य – दूरदर्शन)