अमृतसर (पंजाब) – मनुष्य आणि प्राणी यांच्या रुग्णवाहिका आणि रुग्णालये आपण पाहिल्या असतील. परंतु पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात एक अनोखे रुग्णालय तथा रूग्णवाहिका सुरू झाली असून नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे. आपण आता एक अनन्य साधारण रुग्णालय आणि रुग्णवाहिका (ट्री अॅम्ब्युलन्स ) संबंधी जाणून घेऊ या…
सदर रुग्णालय पर्यावरण संरक्षणास प्रेरित करत असून अमृतसरमधील हे रुग्णालय झाडे आणि वनस्पतींवर उपचार करत आहे. भारतीय महसूल अधिकारी (आयआरएस) रोहित मेहरा यांनी देशातील ही पहिली वृक्ष रुग्णवाहिका सुरू केली आहे.
विशेष गोष्ट अशी की, त्यामध्ये सुमारे ३२ प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातील. मेहरा म्हणतात की, जेव्हा झाडे आजारी पडतात तेव्हा ती उपटून टाकू नका, कारण ते बरे होऊ शकतात. आयुर्वेदाच्या आधारे झाडांवर उपचार केले जातील.










