नाशिक – जागतिक अवयव दान दिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे गुरुवारी (१३ ऑगस्ट) रोजी सकाळी ११.३० वाजता ऑललाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णांना पुर्नजीवन देण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदानाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे. यासाठी होणाऱ्या या चर्चासत्रात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर हे ’अवयवदान – काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, अवयव दान ही सर्वश्रेष्ठ दान असून याबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. अवयवदानाचे महत्व विद्यार्थी व सर्वांना कळावे यासाठी विविध उपक्रम राबविणेबाबत मा. कुलपती कार्यालयाच्या निर्देषित करण्यात आले आहे. सध्या कोविड-१९ आजाराची परिस्थितील लक्षात घेता विद्यापीठाने अवयवदान विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले असून मा. कुलगुरु यांच्या समवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे, डॉ. भाऊसाहेब मोरे, सुनिल देशपांडे आदी मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त विद्यापीठातर्फे आयोजित चर्चासत्र https://youtu.be/Bqv2J7cm-3Y या यु-टयुब लिंकवरुन विनाशुल्क प्रसारित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी ऑनलाईन चर्चासत्राबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. अवयवदानाविषयी अधिक माहिती व मार्गदर्षन मिळण्यासाठी महाविद्यालय प्रमुखांनी सर्वांना चर्चासत्र पहाण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.