नवी दिल्ली – वेगाचे आणि पर्यायाने गाड्यांचे आकर्षण कोणाला नसते? त्यामुळेच गाड्या खरेदी करताना अनेकदा त्याचे मायलेज पाहिले जाते. तर काहीजण किंमतीचा विचार आधी करतात. तर काहीजण आपल्या बजेटमधील कोणती गाडी जास्त मायलेज देईल, याचा विचार करतात. सर्वाधिक लोक या तिसऱ्या गटात मोडतात. अशाच काही गाड्यांची माहिती आम्ही देणार आहोत. ज्या बजेटमध्येही बसतील आणि या महागाईत पेट्रोलचीही बचत करतील.
टाटा टिअॅगो
टाटाच्या या गाडीची किंमत आहे ४.८५ लाख ते ६.८४ लाख. (एक्स शोरुम). ही गाडी नऊ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीत १.२ लीटर पेट्रोल इंजिन आहे. या गाडीचे मायलेज पाहिले तर एका लीटरमध्ये ही गाडी २० किमी. धावत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
रेनॉल्ट क्वीड
या यादीतील दुसरी गाडी आहे, रेनो क्वीड. याची किंमत ३.१२ ते ५.३१ लाख(एक्स शोरूम, दिल्ली) एवढी आहे. यात पाच प्रकार उपलब्ध असून दोन पेट्रोल इंजिन आहेत. ०.८ ली. आणि १.० ली. असे दोन पर्याय इंजिनमध्ये उपलब्ध आहेत. तर एका लीटरमध्ये ही गाडी २१ ते २२ किमी. जात असल्याचा कंपनीचा दावा आहे.
मारुती आल्टो
मारुतीची ही गाडी मुळातच लोकप्रिय आहे. याची किंमत २.९९ ते ४.४८ लाख (एक्स शोरूम) एवढी आहे. ही गाडी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून यातील L प्रकारची गाडी सीएनजी किट सोबतही मिळते. ही गाडी एका लीटरमध्ये २२ किमी. धावत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
या आहेत तुमच्या बजेटमधील स्वस्त आणि मस्त गाड्या. आता कोणती गाडी घ्यायची याचा निर्णय घेणे, तुम्हाला निश्चितच सोयीचे होईल.