सॅन्फ्रासिस्को – अॅप्पलच्या आयफोनला भरपूर मागणी असते, असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. पण हा खरा नाही, हे ही बातमी वाचली की तुमच्या लक्षात येईल. ऑक्टोबर २०२० मध्ये आयफोन १२ ही सिरीज लाँच करण्यात आली. याअंतर्गत कंपनीने ४ फोन लॉन्च केले. यातील आयफोन १२ मिनी हा सगळ्यात छोटा आणि सर्वात स्वस्त फोन. हा फोन जगातील सर्वात छोटा, हलका असा ५ जी फोन आहे. पण एवढे सगळे असूनही कंपनीच्या अपेक्षेनुसार याला मार्केट मिळालेले नाही. आणि यामुळे अॅप्पल या फोनचे उत्पादन बंद करू शकते.
फोनची स्क्रीन ५.४ इंच असून यात एज टू एज डिस्प्ले आहे. तसेच यात ड्युअल रिअर कॅमेराही आहे. लॉन्च होण्यापूर्वी या आयफोन १२ मिनीची खूप चर्चा होती. याची खूप विक्री होईल, अशी कंपनीची अपेक्षा होती. परवडणाऱ्या दरातील स्मार्ट फोनला भरपूर मागणी असलेल्या भारतात, याला नक्कीच चांगले मार्केट मिळेल, ही कंपनीची आशा फोल ठरली.
रिपोर्टनुसार, आयफोन १२ मिनीला खूप कमी मागणी आहे. तर आयफोन १२ प्रो मॅक्सला जास्त मागणी आहे. याच्या विक्रीत वाढ होऊन ती ११ दशलक्षांवर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते, आयफोन १३ या स्मार्टफोन सिरीजचे उत्पादन लवकर सुरू होऊ शकते.