मुंबई – फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट उद्या आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही Kiger अधिकृतरित्या लॉन्च करणाक आहे. त्यानंतर भारतात काही महिन्यांनी गाडी दाखल होईल. भारतात ही गाडी Kia Sonet, Tata Nexon आणि Ford Ecosport ला टक्कर देईल.
अलीकडेच लॉन्च झालेल्या निसान मॅग्नाईटच्या धरतीवर किगरला तयार करण्यात आले आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे बरेचदा परीक्षणही करण्यात आले आहे. त्यामुळेच या गाडीचे ड़िझाईन जगभर व्हायरल झाले. या गाडीत एक स्कल्पट टेलगेट, एक आकर्षक एलईटी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसोबतच हाय माऊंट स्टॉप लॅम्प, टेलगेट माऊंटेड स्पॉयलर, वायपर आणि बम्पर देण्यात आले आहेत. या गाडीच्या इंटेरियरमध्ये डुअल-टोन कलर स्कीम असेल. यात एप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड आटो कनेक्टिव्हीटीसोबत डॅशबोर्ड, आठ इंचाचा टरस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, क्रुज कंट्रोल, पुश बटण स्टार्ट व स्टॉप आदींचा समावेश आहे. किगरमध्ये कंपनी नॅचरली एस्पिरेटेड १.० लिटर तीन-सीलींडर टर्बो पेट्रोल इंजीनचा वापर करणार आहे. त्यामुळे कंपनी या गाडीच्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये सीव्हीटी आटोमेटिक ट्रान्समिशनला सामील करण्याची शक्यता आहे. सध्या किमती बाबत स्पष्टता नसली तरीही ५ लाखापासून सुरुवात होईल, असे बोलले जात आहे.