– ख्यातनाम लेखक रंगनाथ पठारे यांच्या शुभहस्ते संपन्न
– अभिनेते दीपक करंजीकर, किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक – सुप्रसिद्ध कवी राजू देसले यांच्या ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवारी कुसुमाग्रज स्मारक येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
विश्वास ग्रुप, ग्रंथ तुमच्या दारी, कॉपर कॉईन पब्लिशिंग, पुस्तक पेठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित केला होता. या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम लेखक रंगनाथ पठारे यांच्या शुभहस्ते झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास जयदेव ठाकूर आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र, कवी-चित्रकार मंगेश नारायणराव काळे, कवी कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कॉपर काईनचे संचालक सरबजीत गरचा, कवी समिक्षक गोविंद काजरेकर, लेखिका डॉ. निर्मोही फडके आदी उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्यात ‘अवघेचि उच्चार’ कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन अभिनेते किशोर कदम व डॉ. निर्मोही फडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजन देविदास चौधरी, प्रकाश होळकर, विनायक रानडे, निखिल दाते यांनी केले.