- संकट कोणतंही येवो लढायचं हटायच नाही असा संदेश
दिंडोरी : वातावरणात थोडासा बदल झाला की शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठत असून शेतकऱ्यांची अवस्था भयानक होत आहे. मंगळवारी पहाटे पाऊस आला अन खेडले येथील युवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आपल्या लेखणीतून भीतीही व्यक्त केली अन धीरही दिला. संकट कोणतंही येवो लढायचं हटायच नाही असा संदेश त्याने नंतर सोशल मीडियावर टाकला व तो तूफान व्हायरलही झाला. वाचा हा मेसेच…..
काय लिहावं सुचत नाहीये कारण…..
रात्री अचानक घराच्या पत्र्यावर पावसाचे थेंब वाजायला लागले की काळजात धडधड वाढते.
सध्या सर्वच द्राक्ष विभागातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालय या बेमोसमी पावसानं नेहमीच आपली परीक्षा घेतली आहे.
तरी आपण घाबरायचं नाही धीराने परीक्षा दयायची आपल्याला उत्तीर्ण करायचं की अनुत्तीर्ण हे निसर्गाच्या हातात आहे. त्याला आपण काही करू शकत नाही, आपल्या हातात फक्त एकच आहे “जोमाने लढत राहायचं हटायचं नाही”
गणेश वाळके, द्राक्ष उत्पादक