नाशिक – अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा छडा नाशिक पोलिसांनी लावला आहे. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींसह फूस लावून विवाह करण्याच्या आमिषाने राजस्थान व गुजरात येथे नेलेल्या दोन महिलांची सुटका सातपूर पोलिसांनी केली आहे. तर, पैसे घेऊन विवाह करणाऱ्या टोळीलाही गजाआड केले आहे. अल्पवयीन मुलगी व दोन महिलांची पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सुखरुप सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार मनोहर सूर्यवंशी, सागर कुलकर्णी, विनायक आव्हाड, जावेद शेख, डी. के. पवार, राजेंद्र घुमरे यांनी राजस्थान अाणि गुजरातमध्ये तपास केला.