मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विविध कारणांमुळे त्या सतत चर्चेत असतात. पण, आता त्यांनी अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांच्याबद्दल त्यांनी अयोग्य शब्द वापरला आहे. तसे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे एखाद्या महिलेने आणि त्यातही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने ज्येष्ठ नेत्यांविषयी सांभाळून बोलावे, असा सल्ला अनेक जण देत आहेत. तसेच, याप्रकरणामुळे अमृता फडणवीस सध्या ट्विटरवर ट्रोल झाल्या आहेत. तर, सोशल मिडियात त्यांच्यावर कडाडून टीका होत आहे.
अमृता फडणवीस यांचे ट्विट आणि त्यांनी वापरलेली भाषा अशी
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1374058492793778182