नवी दिल्ली – कोरोना संक्रमानाच्या पार्श्वभूमीवर आज सादर झालेला अर्थसंकल्प हा महत्वाचा असून तो देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. रस्ते पाणी ,स्वछता आरोग्य या बरोबरच अनेक पायाभूत सुविधा बळकट करण्याकडे अधिकचे लक्ष देण्यात आले आहे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून आता शेतमालाला हमीभावा पेक्षा दीड पट अधिक भाव मिळणार व ग्रीन ऍप च्या माध्यमातून २२ नवीन पिकांच्या शेतमाल निर्यातीस परवानगी दिली असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या खासदार डॅा. भारती पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मासे पालन शेती उद्योगासाठी मोठी तरतूद केली आहे,एपीएमसी. अधिक बळकट करण्यावर भर दिला असून ई नाम साठी १००० अधिकच्या नवीन ई – बाजार उभारणार असून शेतकरी हितासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. जमिनीचे कागदपत्रे डिजिटल होणार, युवांसाठी रोजगार संधी निर्माण करणारा ,आरोग्यक्षेत्रात भरीव तरतूद करणारा, सरकारी बँकांना सक्षम करणारा,नियम आणि प्रक्रियांमध्ये अधिक सुलभता आणणारा ,स्वदेशी वस्तुंना उभारी देणारा, गरीब, मध्यमवर्गीयांना, उद्योजकांना ,दिलासा देणारा, विकास आणि विश्वास यांचा संगम असणारा हा अर्थसंकल्प आहे. महत्वाचे म्हणजे नाशिक येथे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद पण या बजेट मध्ये करण्यात आली आहे . हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक असून देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा आहे.